इचलकरंजी पाणी पुरवठा व्यवस्थेचे जलपरिक्षण करावे अशी मागणी उमाकांत दाभोळे यांनी निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली

इचलकरंजी शहरातील नागरिक सध्या दर ३ ते ५ दिवसांनी कमी दाबाने(facing)होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या त्रासाला सामोरे जात आहेत. कृष्णा पाणी पुरवठा योजना मजरेजवाडी येथून ३६ एमएलडी आणि पंचगंगा योजना येथून ९ एमएलडी इतका मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होऊन देखील पाणी टंचाई का भासत आहे, याची चौकशी व्हावी आणि २०१६ नंतर पाणीपुरवठा विभागाने जलपरिक्षण वॉटर ऑडिट केले असल्यास त्याबाबतची संपूर्ण माहिती जनतेपुढे यावी, अशी मागणी उमाकांत दाभोळे यांनी प्रशासक पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दाभोळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मजरेजवाडी(facing) व पंचगंगा पाणी पुरवठा योजनांमधून होणाऱ्या पाणी उपशानंतर वितरणापर्यंत सुमारे २०% ते २५% पाणी पाईप गळतीमुळे वाया जात आहे. त्याशिवाय अनेक ठिकाणी टाक्या भरल्यानंतरही पाणी बंद न झाल्याने लाखो लिटर पाणी नासते आहे. शहरातील वितरण व्यवस्थेतील जुन्या पाईपलाइनवरील कनेक्शन, व्हॉल्व गळती आणि त्यासंबंधित दोष दूर केल्यास जवळपास ३०% पर्यंत पाणी बचत होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

त्यामुळे वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी ऑनलाईन स्कॉडा बटरफ्लाय व्हॉल्व यंत्रणा (facing)बसवण्यात यावी आणि संपूर्ण पाणी पुरवठा व्यवस्थेचे जलपरिक्षण करून रिपोर्ट प्रसिद्ध करावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.सदर मागणीचे निवेदन मा. खासदार धैर्यशील माने, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुरेश हाळवणकर व आमदार डॉ. राहुल आवाडे यांनाही सादर करण्यात आले आहे.या मागणीवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! फक्त 100 रुपयांच्या दारुच्या बाटलीने केली कमाल

मैत्री, भेटायला बोलवलं अन् अत्याचार; १५ वर्षीय मुलीबरोबर खोलीत ‘नको ते घडलं’; परिसरात खळबळ

पाकिस्तानमध्ये जय श्रीराम, मुस्लिम कलाकारांनी सादर केले रामलीला नाट्य; पाहा VIDEO