Toyota Hyryder Hybrid SUV ही दमदार कार्सपैकी एक आहे. (sell my car)जर तुम्ही ही कार लोनवर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग तुमचा पगार किती असावा त्याबद्दल जाणून घेऊयात.

टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर ही एक परवडणारी हायब्रिड एसयूव्ही आहे. इंधन कार्यक्षमता आणि आकर्षक लूकमुळे ही कार ग्राहकांमध्ये खूप पसंत केली जाते. जर तुम्ही ही कार खरेदी करण्याचा विचार(sell my car) करत असाल तर याची किंमत, डाउन पेमेंट आणि फीचर्स जाणून घेणे महत्त्वाचे आहे. टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरची एक्स-शोरूम किंमत 11.34 लाखांपासून सुरू होऊन 19.99 लाखांपर्यंत जाते. याचा मजबूत हायब्रिड व्हेरिएंट 16.81 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
टोयोटा हायब्रीडची ऑन-रोड किंमत किती?
दिल्लीमध्ये या कारच्या ऑन-रोड किमतीबद्दल बोलायचे झाले तर, ई निओड्राइव्ह माइल्ड हायब्रीड व्हेरिएंट सुमारे 13.28 लाखांना येतो. एस हायब्रीड व्हेरिएंटची किंमत सुमारे 19.60 लाख आहे. यामध्ये आरटीओ कर, विमा आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत. जर तुम्हाला बेस व्हेरिएंट लोनवर खरेदी करायचे असेल तर (sell my car)तुम्हाला किमान 2 लाखांचे डाउन पेमेंट करावे लागेल. यानंतर, तुम्हाला 11.28 लाखांचे कर्ज घ्यावे लागेल. जर हे कर्ज 5 वर्षांच्या कालावधीसाठी 9% व्याजदराने उपलब्ध असेल, तर तुमचा मासिक ईएमआय सुमारे 23,000 असेल.
हायब्रिड व्हेरिएंटवर किती डाउन पेमेंट भरावे लागेल?
जर तुम्ही हायब्रिड व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर किमान 5 लाखांचे डाउन पेमेंट करावे लागेल आणि 14.60 लाखांचे कर्ज घ्यावे लागेल. यानंतर, 9% व्याजदराने 5 वर्षांसाठी ईएमआय सुमारे 30,000 प्रति महिना असेल. याचाच अर्थ ही कार खरेदी करण्यासाठी तुमचा किमान पगार 50 हजार तरी असावा.
हायड्राइडर एसयूव्हीमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि 6-स्पीकर ऑडिओ सिस्टम अशा अनेक प्रीमियम फीचर्ससह येते.
सेफ्टीसाठी, त्यात 6 एअरबॅग्ज आणि 360-डिग्री कॅमेरा देखील आहे. या एसयूव्हीला तीन इंजिन पर्याय मिळतात.
टेस्टिंग दरम्यान पुन्हा स्पॉट झाली इलेक्ट्रिक Mahindra XUV700, लवकरच होणार लाँच
या कारच्या ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि e-CVT यांचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की त्याचा पेट्रोल हायब्रिड व्हेरिएंट 1 लिटरमध्ये 27.97 किमी मायलेज देतो. त्याच वेळी, सीएनजी व्हेरिएंटचा मायलेज 26.6 किमी प्रति किलो आहे.
हेही वाचा :
YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर
घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे