प्रेमी जोडप्याला जनावरांसारखी वागणूक, गावकऱ्यांनी जे केलं ते अंगावर काटा आणणारं

प्रत्येक लव्ह स्टोरी प्रेमात दुश्मन असतातच. त्या काळातच नाही तर आजही प्रेमीयुगुलांना(couple) प्रेमाची मोठी किंमत मोजावी लागते. अशीच एक धक्कादायक घटना ओडिशातून समोर आली आहे. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या कपल ला जमावाने तालिबानी शिक्षा दिली आहे. हा भयंकर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ओडिशामध्ये गावकऱ्यांनी प्रेम जोडप्याला प्रेमविवाहासाठी(couple) तालिबानी शिक्षा दिली. शिक्षेच्या नावाखाली गावकऱ्यांनी दोघांनाही बैलाप्रमाणे नांगराला बांधले आणि त्यांना शेत नांगरायला लावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर समाजावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

लग्नावर संतापलेल्या गावकऱ्यांनी दोघांनाही एक अनोखी शिक्षा दिली. या जोडप्याला(couple) अपमानित करण्यासाठी, गावकऱ्यांनी बांबू आणि लाकडापासून बनवलेले एक जोखड त्यांच्या खांद्यावर बांधले, जे सहसा शेत नांगरण्यासाठी बैलांवर ठेवले जाते. यानंतर, त्यांना सर्वांसमोर शेतात नांगर ओढण्यास भाग पाडले गेले. या दरम्यान, आजूबाजूचे गावकरी फक्त तमाशा पाहत राहिले, कोणीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

या अपमानास्पद शिक्षेनंतर, दोघांनाही गावाच्या मंदिरात नेण्यात आले आणि शुद्धीकरण विधी देखील करण्यात आले. या प्रकरणाबाबत, पोलिस निरीक्षक म्हणाले की त्यांना व्हायरल व्हिडिओबद्दल माहिती मिळाली आहे आणि पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. दरम्यान अद्याप पोलिस ठाण्यात या संदर्भात कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

तालिबानी शिक्षेचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. सोशल मीडियावरील बहुतेक लोकांनी लग्न करण्यासाठी या प्रकारची शिक्षा दिल्याबद्दल जोडप्यावर टीका केली. अनेक वापरकर्त्यांनी याला मागास विचारसरणी म्हटले. त्याच वेळी, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गावकऱ्यांवर कठोर शिक्षा करण्याची मागणी लोक करत आहेत. याशिवाय, अनेक लोकांनी जोडप्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

पगाराच्या थकबाकीवरून घंटागाड्या ठप्प, कामगारांच्या आंदोलनानंतरच काम सुरू

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

सारा तेंडुलकरची आई अंजलीने गिलला बघून हसताच जडेजाने घेतली शुभमनची घेतली मजा, Video Viral