जर तुम्ही उत्तम फिचर्स आणि तुमच्या बजेटमध्ये बसणारा नवीन स्मार्टफोन(smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण Amazon सध्या Motorola Edge 50 Pro या दमदार स्मार्टफोनवर मोठी सूट देत आहे. हा स्मार्टफोन आपल्या आकर्षक डिझाइन, शक्तिशाली प्रोसेसर आणि सुपरफास्ट चार्जिंगसाठी ओळखला जातो.

मोटोरोला एज 50 प्रोचा Moonlight Pearl रंगातील 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट भारतात मूळतः ₹35,999 किमतीत लॉन्च करण्यात आला होता. मात्र, Amazon वर सुरू असलेल्या खास ऑफरअंतर्गत हा फोन आता केवळ ₹23,670 रुपयांत उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना तब्बल ₹12,329 रुपयांची फ्लॅट सूट मिळत आहे. त्याशिवाय Amazon वर विविध बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसही उपलब्ध आहे. ग्राहक आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून आणखी ₹22,250 रुपयांपर्यंतची अतिरिक्त बचत करू शकतात.
फीचर्सबद्दल बोलायचं झालं, तर Motorola Edge 50 Pro मध्ये 6.7-इंचाचा 1.5K pOLED वक्र डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट, HDR10+ सपोर्ट, आणि 2000 निट्स पीक ब्राइटनेस प्रदान करतो. यामुळे वापरकर्त्यांना उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळतो.हा फोन नवीनतम Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरने सुसज्ज असून, 12GB रॅम आणि 256GB इनबिल्ट स्टोरेजसह येतो. यात 4500mAh बॅटरी असून, ती 125W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे फोन काही मिनिटांतच फुल चार्ज होतो.
फोटोग्राफीसाठी, फोनच्या(smartphone) मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे — 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा (OIS सह), 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स, आणि 10 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स 3x ऑप्टिकल झूमसह दिला आहे. फ्रंटमध्ये 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असून तो व्हिडिओ कॉल आणि पोर्ट्रेटसाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स देतो.एकंदरीत पाहता, Motorola Edge 50 Pro हा प्रीमियम लूक आणि दमदार परफॉर्मन्ससह ₹25,000 च्या आत उपलब्ध होणारा सर्वात आकर्षक स्मार्टफोन ठरू शकतो. मात्र, या ऑफर मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध आहे, त्यामुळे इच्छुकांनी ही डील संपण्यापूर्वी Amazon वरून तातडीने खरेदी करावी.

हेही वाचा :
दारु पिऊन पठ्ठ्या थेट बैलाला भिडला अन्…; पुढं जे घडलं पाहून हसू आवरणार नाही, Video Viral
विराट कोहली-रोहित शर्माला BCCI चं थेट फर्मान, एकाच अटीवर संघात मिळणार स्थान
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, आयुष्यातील शेवटच्या लढाईतून घरी परतला He-Man