कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच महिन्यात देशवासीयांना संबोधित करताना काटकसर करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहना मागचा गर्भित अर्थ सध्या सर्वसामान्य जनतेला कळू लागलेला आहे किंवा कळून चुकला आहे. बारा वर्षांपूर्वी “अच्छे दिन” चे नारे देणाऱ्यांना”बुरे दिन आने वाले है”हे अप्रत्यक्ष सांगावे लागत आहे हे किती दुर्दैवी आहे!

पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांचे गेल्या महिन्याभरात तीन ते चार वेळा दर वाढलेले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर इतके वाढलेले आहेत कि अनेक व्यावसायिकांनी आपले धंदे बंद करणे पसंत केले आहे. घरगुती वापरायच्या गॅस सिलेंडरचे दर गेल्या महिन्यात पन्नास रुपयांनी वाढवण्याचा आले होते तर आता रविवार दिनांक 7 जून पासून या सिलेंडरची किंमत 29 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. (growing) त्यामुळे आता घरोघरी महागाईचे भयंकर चटके बसू लागले आहेत. आणि ते वाढतच जाणार आहेत असे केंद्र शासनानेच संकेत दिलेले आहेत.गेल्याच महिन्यात केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर भारतीयांचे दरडोई उत्पन्न वाढले असल्याचा दावा करण्यात आला आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याला भागिले लोकसंख्या असा हिशोब मांडून भारतीयांचे दरमहाचे उत्पन्न 17 हजार 110 रुपये असे सांगितले गेले आहे. ही आकडेवारी मुद्दाम सांगितली गेलेली आहे. कारण वाढत्या महागाईला या उत्पन्नात रोखता येते असे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. दरडोई उत्पन्न वाढले असेल तर मग सरासरी क्रयशक्ती कमी का झालेली आहे याचेही उत्तर अपेक्षित आहे.
इजरायल, अमेरिका विरुद्ध इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरातील अनेक देशांना महागाईच्या झळा बसत आहेत. ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते तेव्हा महागाई वाढते. वास्तविक या युद्धाचे अप्रत्यक्ष पण भयानक परिणाम भारतावर काय होऊ शकतात याचे भान असणाऱ्या राज्यकर्त्यांनी, आधीच खबरदारी घेऊन उपाय योजना का केल्या नाहीत? या केंद्र शासनाला दर वाढीचे टप्प्याटप्प्याने लोकांना धक्के द्यावयाचे आहेत. त्याची सुरुवात गेल्या महिन्यापासून झाली आहे. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळून चालली आहे, (growing) आणि त्याची किंमत राज्यकर्त्यांना चुकवावी लागेल असा इशारा शरद पवार यांनी कोल्हापुरातून दिला आहे. वास्तविक त्यांनी या वाढत्या महागाई मागची कारणे सांगणे आवश्यक होते आणि महागाई रोखण्यासाठी काय करता येऊ शकते याचे मार्गदर्शन त्यांच्याकडून अपेक्षित होते आणि आहे.
युद्धामुळे पश्चिम आशियाई देशांवर ऊर्जा संकट आले आहे. ऊर्जा स्रोत अडचणीत आलेले आहेत किंवा ते नादुरुस्त झालेले आहेत. (growing) त्यामुळे इंधन टंचाई निर्माण झाली आहे,असे सरसकट म्हणता येणार नाही. कारण तसे असते तर मागणीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे इंधन उपलब्ध झालेच नसते. इंधन संपन्न राष्ट्रांनी युद्धाचे कारण पुढे करून दर वाढवलेले आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी इंधन उपलब्ध आहे. आणि ते महाग दराने विकत घेण्याशिवाय भारतासह अन्य राष्ट्रांना पर्याय नाही. भारताची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आल्यानंतर आता इंधनाला पर्याय शोधला पाहिजे असे विचार पुढे येऊ लागले आहेत. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी इंधनाचे परावलंबित्व शून्यावर आणायचे झाले तर थोरियम पासून इंधन निर्मितीला पर्याय नाही असे सांगितले आहे. वास्तविक हीच भूमिका डॉक्टर शिवराम भोजे यांनी फार पूर्वी मांडलेली होती. नितीन गडकरी यांनी सुद्धा इंधनाला पर्याय सुचवले आहेत. वास्तविक अशाच प्रकारे भविष्यात युद्धाला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे असा विचार करून आत्ताच ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी पर्यायी इंधनाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल.
हेही वाचा :
रिमझिमल्या जलधारा ! मुसळधार पावसाचा उद्यासाठी ‘यलो अलर्ट’