नांदणी मठात माधुरी हत्तीच्या ‘घरवापसी’साठी राजू शेट्टीं यांचे उपोषण सुरू कोल्हापूर जिल्ह्यातून पाठबळ?

कोल्हापूर वनतारा पशुसंग्रहालया मध्ये असलेल्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील प्रसिद्ध माधुरी हत्तीच्या घरवापसीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी नांदणी निशिधिका या ठिकाणी उपोषण सुरू केले आहे. नांदणी येथे सुरू असलेल्या “एक उपवास माधुरी हत्तीच्या घरवापसी साठी “ या जनसंकल्प उपक्रमास दत्त उद्योग समुहाचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील , वीर सेवा दल अध्यक्ष विजय पाटील, पंचायत समिती सदस्या निलमताई म्हेत्रे, शेखर पाटील, दरगू गावडे यांचेसह मान्यवरांनी पाठिंबा दिला. (Madhuri elephant) या उपोषणामध्ये महादेव जानकर, ग्रामस्थ, नांदणी मठातील भाविक यांचाही सहभाग आहे.

माधुरी हत्ती ४० वर्षांपासून नांदणी मठात होती. ती गावाची शान मानली जात होती. माधुरी’ ही गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या हृदयात स्थान मिळवून होती. ती केवळ एक प्राणी नव्हती, तर नांदणी मठाची स्नेही, धार्मिक प्रतीक आणि गावाच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग होती. नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील जैन समाजाच्या ७४८ गावांचा केंद्रबिंदू आहे. या मठाचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. (Madhuri elephant) याच मठात गेल्या अनेक दशकांपासून परंपरेनुसार हत्ती पाळण्याची प्रथा आहे. महादेवी ही त्या परंपरेची जीवंत प्रतिनिधी होती. गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून ती मठात राहत होती. मठाचे मठाधिपती प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी तिला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं, सांभाळलं. तिच्या शिस्तबद्ध वर्तनामुळे ती मठाची स्नेही म्हणून ओळखली जाऊ लागली. वनतारा ट्रस्टने कायदेशीर लढाई जिंकून महादेवीला गुजरातला नेले. त्यावरून गावात आंदोलन झाले होते.

मठाकडून हत्तीची देखभाल करताना हेळसांड होत असल्याची तक्रार पेटा या प्राणीमित्र संघटनेने केली होती. पुढे न्यायालयाच्या आदेशानुसार हत्ती वनतारा पशुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आला होता. या विरोधात कोल्हापुरात उग्र आंदोलन झाल्यानंतर वनताराकडून हत्ती मठाकडे पाठवण्याची तयारी दर्शवण्यात आली. याबाबत सर्वोच्च न्यायालय, राज्य शासन, उच्चाधिकार समितीने माधुरीला पुन्हा नांदणी मठात पाठवण्याबाबत परवानगी दिली आहे. तथापि, तज्ञ समितीकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अंतिम अहवाल देण्याबाबत जाणीवपूर्वक उशीर केला जात आहे, असा राजू शेट्टी तसेच हत्तीप्रेमींकडून आरोप केला जात आहे. प्रशासनाच्या या धोरणामुळे सांगली, कोल्हापूर जिल्हा आणि सीमाभागातील उत्तर कर्नाटकातील भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

जैन धर्मीय प्रथमाचार्य श्री शांतीसागर महाराज यांची ७१ वी जयंती पहिल्यांदाच नांदणी गावात, मठात आगामी १७ सप्टेंबर रोजी भव्य स्वरूपात साजरी होणार आहे. या सोहळ्यामध्ये माधुरी हत्तीची उपस्थिती असणे हा जैन समाज, स्थानिक जनतेच्या अस्मितेचा, श्रद्धेचा मुद्दा आहे. हा सोहळा जवळ येत असल्याने तज्ञ समितीने तात्काळ स्थळ पाहणी करून माधुरीला नांदणी मठात आणण्याचा मार्ग मोकळा करावा, ही जनतेतून मागणी होत आहे. (Madhuri elephant) याबाबत राजू शेट्टी यांनी, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि जनतेची भावना असतानाही प्रशासन ढिम्म आहे. माधुरी हत्ती वनतारा येथे जाऊन १ वर्ष पूर्ण होत आले तरी तिला आणण्यात यश आलेले नाही. तज्ञ समितीने त्वरित पावले उचलली नाहीत, तर हे आंदोलन तीव्र केले जाईल. २८ जुलैचे उपोषण हा प्रशासनाला शेवटचा इशारा असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनात नांदणी, कोल्हापूर, सांगली आणि उत्तर कर्नाटकातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?