बच्चू कडूंसह 12 जणांवर गुन्हे दाखल…

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (politics)यांनी शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवत सरकारला धारेवर धरण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे. दरम्यान माजी मंत्री बच्चू कडूंच्या पदयात्रेने सध्या महाराष्ट्र ढवळून निघालाय. आशातच आता बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्या प्रकरणी बच्चू कडूंसह 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यवतमाळच्या महागांव पोलिसात बच्चू कडू सह 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पुढे आलेल्या माहितीनुसार, बच्चू कडू यांच्या पदयात्रेची समारोपीय सभा श्री गजानन महाराज मंदिर आंबोडा येथे नियोजित होती. मात्र ऐनवेळी आयोजकांनी व बच्चू कडू यांनी समारोपीय सभा आंबोडा उडान पुलावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर आयोजित केली.

ट्रॅक्टर महामार्गवर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली होती. याप्रकरणी बच्चू कडूंसह(politics) आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समारोप सभा घेतल्याने तब्बल तीन तास दोन्ही बाजुची वाहतुक ठप्प झाली होती. त्यामुळे माजी मंत्री बच्चू कडूनसह 12 जणांवर महागाव पोलिसात राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आंबोडा येथील श्री गजानन महाराज मंदिर ग्राम या ठिकाणी सातबारा कोरा यात्रा समारोपीय सभा नियोजित होती. परंतु ही पदयात्रा आंबोडा गावात दुपारच्या सुमारास नागपूर ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर पोहोचली. या पदयात्रेमध्ये बच्चू भाऊ कडू यांचे नेतृत्वात 5000 ते 7000 जनसमुदाय उपस्थित होता. यासह 30 ते 40 ट्रॅक्टर होते. यातील जमाव राष्ट्रीय महामार्ग खडका ते आंबोडापर्यंत दोन्ही बाजूनी चालत होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.

त्यांना वारंवार पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी यांनी महामार्गाच्या(politics) एका बाजूने चला, असे वारंवार सांगितले. तरी सुद्धा त्यांनी ऐकले नाही. तसेच ही पदयात्रा समारोपीय सभा श्री गजानन महाराज मंदिर आंबोडा येथे नियोजित असताना एनवेळी आयोजकांनी व बच्चुभाऊ कडू यांनी समारोपीय सभा आंबोडा उडान पुलावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर आयोजित केली व ट्रॅक्टर महामार्ग यावर आडवे लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली.

तसेच पदयात्रा संबंधाने आयोजकांनी कुठलेही कायदेशीर परवानगी घेतली नाही. परिणामी, आयोजकांनी बेकायदेशीर जमाव जमवून नियोजित ठिकाणी सभा न घेता ग्राम अंबोडा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील अंबोडा उड्डाण पुलावर ट्रॅक्टर आडवे करुन व 5000 ते 7000 लोकांना राष्ट्रीय महामार्गाच्यामध्ये बसवुन वाहतुक थांबविली. तसेच प्रतिबंधक आदेशाचे उल्लघंन केले. या प्रकरणी कलम 126(2), 189(2), 223 भारतीय न्याय संहीता सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :

मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं बेतलं जीवावर

महाराष्ट्रामधील Ola ची 385 शोरूम अचानक बंद… लाखो ग्राहकांना बसणार मोठा फटका

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, तारीख अन् ठिकाण झालं फिक्स, वाचा सविस्तर