इचलकरंजी : येथील प्रसिद्ध कवी, वक्ते आणि डी. के. ए. एस. सी कॉलेजचे प्रा. रोहित शिंगे यांच्या कवितांचा(poetry) समावेश ‘कलानगरीची कविता’ या संग्रहात करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील नव्या पिढीतील निवडक कवींच्या कवितांचा ज्येष्ठ साहित्यिक एकनाथ पाटील यांनी संपादन केलेल्या ‘कलानगरीची कविता’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कोल्हापूर येथे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ साहित्यीक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे आणि शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या संग्रहात संग्रहात प्रा. रोहित शिंगे यांच्या चुंबळ आणि शहर या दोन कवितांचा(poetry) समावेश करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. प्रा. शिंगे यांनी काव्यांगण व काव्यसंध्या या प्रसिद्ध कविसंमेलनांच्या माध्यमातून काव्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करत आहे.

त्यांच्या या क्षेत्रातील वाटचालीस या पुस्तकाच्या निमित्ताने बळ मिळाले आहे. त्यांना श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, सेक्रेटरी प्राचार्या डॉ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कौस्तुभ गावडे आणि प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

हेही वाचा :
इचलकरंजीत गवा रेड्याचा थरार! नागरी वसाहतीत रात्री उधळला गवा रेडा
चारच दिवसात पैसा डबल; या शेअरने बाजारात आणले तुफान
‘ही’ आहे भारतातील नंबर 1 दारू, अंतिम व्हिडीओ पटकावला मानाचा किताब