१४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी दोन मुले,मोठ्या जिद्दीने झाली IPS; एन अंबिका यांचा प्रवास

शिक्षणाला कोणतेही वय नसतात, असं म्हणतात. कोणत्याही वयात(study) तुम्ही शिक्षण घेऊ शकतात. त्यासाठी तुमच्याजवळ फक्त इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची ताकद असायला हवी. असंच काहीस एन अंबिका यांनी केलं. त्यांनी लग्नानंतर संसार अन् मुलं सांभाळत यूपीएससी परीक्षा दिली आहे. त्यांनी आयपीएस होऊन आपले स्वप्न पूर्ण केले. याचसोबत अनेक महिलांसमोर आदर्श ठेवला आहे.

एन अंबिका यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनाही अनेक अडचणींचा सामना (study)करावा लागला. परंतु त्या डगमगल्या नाही. त्यांनी यश मिळवायचे हे ठरवलेच होते. त्यामुळे त्यांनी खूप प्रयत्न केले आणि यश मिळवले.

एन अंबिका या मूळच्या तामिळनाडूच्या रहिवासी आहेत. त्यांचा बालविवाह झाला होता. १४ व्या वर्षीच त्यांचे लग्न झाले आहे. १८ व्या वर्षी त्या दोन मुलींच्या आई होत्या. त्यांचे आयुष्य सुखी होते. परंतु एकदा(study) त्यांच्या कॉन्स्टेबल पतीने प्रजासत्ताक दिनी अधिकाऱ्यांना सॅल्यूट केले. हे अंबिका यांनी पाहिले. या घटनेतूनच त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

अंबिका यांनी आपल्या पतीला विचारले की, तुम्ही यांना सॅल्यूट का केले. तेव्हा त्यांनी सांगितले की, ते वरिष्ठ अधिकारी होते. त्याचवेळी त्यांनी अधिकारी होण्याचे ठरवले. त्यांनी अभ्यास सुरु केला. त्यांनी रोज अभ्यास केला. १०वी, १२वी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

ग्रॅज्युएशननंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. परंतु यासाठी कोचिंग क्लासेसची गरज होती. यासाठी त्यांना चेन्नई येथे जायचे होते. परंतु मुलांना सोडून जाणे खूप कठीण होते. परंतु त्यांच्या पतीने त्यांना साथ दिली आणि त्या कोचिंग क्लासेससाठी चेन्नईला गेल्या.

एन अंबिका यांनी आपल्या चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. तीन वेळा अपयश आले तरीही त्या खचल्या नाही. त्यांनी खूप मेहनत घेतली. आपल्या चुकांमधून त्या अनेक गोष्टी शिकल्या. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले.

हेही वाचा :

18 जुलै शुक्रवारी उभयचारी योगामुळे देवी लक्ष्मीची राहील कृपा, कर्कसह 5 राशींसाठी दिवस ठरेल खास

शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीचे ‘हे’ उपाय करा; आर्थिक संकटातून लगेच होईल सुटका

 बिहारमधील नागरिकांना १२५ युनिट मोफत वीज; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची घोषणा