गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतलेल्या लाखो(rate)कर्जदारांसाठी दिवाळीपूर्वीच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रेपो दरात आणखी कपात होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात EMI आणखी कमी होणार आहे. ही बातमी तुमच्या आर्थिक नियोजनावर थेट सकारात्मक परिणाम करू शकते.

ICICI बँकेचा अहवाल: रेपो दर 5.25% पर्यंत येणार? :
ICICI बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की(rate), रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या बैठकीत रेपो दरात २५ बेसिस पाईंट म्हणजेच ०.२५% कपात करू शकते. त्यामुळे सध्याचा 5.50% असलेला रेपो दर थेट 5.25% वर येण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी 2025 – 0.25% कपात
एप्रिल 2025 – 0.25% कपात
दोन्ही कपातीनंतर रेपो दर 6.50% वरून 6% वर
सध्या तो 5.50% वर आहे आणि आता 5.25% होण्याची शक्यता.
रेपो दरात कपात होताच बँका गृहकर्ज, वाहन कर्ज यासारख्या कर्जांच्या व्याजदरांमध्ये कपात करतात. त्यामुळे तुमच्या EMI मध्ये महिना-दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत कपात होऊ शकते. उच्च कर्ज रकमेच्या बाबतीत हा लाभ हजारो रुपयांपर्यंत जाऊ शकतो.ICICI च्या अहवालात म्हटलं आहे की, महागाईचा आलेख सध्या घसरत चालला आहे. शहरी भागात मागणी थोडी मंदावली असली, तरी ग्रामीण भागात खरेदी चांगली असल्याने एकूण अर्थव्यवस्था संमिश्र स्थितीत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला रेपो दर कपात करण्यासाठी योग्य (rate)संधी आहे.

काय आहे रेपो दर? :
रेपो दर म्हणजे रिझर्व्ह बँक बँकांना जेव्हा पैसे उधार देते, तेव्हा लावण्यात येणारा व्याजदर. हा दर जितका कमी, तितकं कर्ज स्वस्त. त्यामुळे रेपो दरात कपात = स्वस्त कर्ज = कमी EMI.
हेही वाचा :
भारतातील अनोखं मंदिर ज्याचे खांब हवेत लटकतायेत; कुठे आहे हे मंदिर? जाणून घेऊया यामागचं रहस्य
फुफ्फस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी
लॉर्ड्सवर मोहीम फत्ते करण्याची संधी; भारतीय महिलांचा आज इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना