कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
ऑनलाइन खेळली जाणारी जंगली रमी आणि ऑफलाइन खेळली जाणारी(regular)नेहमीची सर्वसाधारण रमी हा कौशल्याचा खेळ मान्य केला गेला असल्याने तो अवैध नाही. पण प्रचलित भाषेत त्याला जुगारच म्हटले जाते. आणि या जुगारात देशभरात रोज हजारो कुटुंबे उध्वस्त होताना दिसतात. अशा या जुगाराला खेळ म्हटले जाते आणि त्याची जाहिरात अनेक सेलिब्रेटीज करत असतात. आता तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कायदेमंडळाचे अधिवेशन सुरू असताना चक्क सभागृहातच ऑनलाईन जंगली रमी मोबाईलवर खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मंत्रीच जंगली रमी खेळत असतील तर मग आपण मागे का राहायचे असा एक चुकीचा संदेश त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला आहे

भारतरत्न सचिन तेंडुलकर, अभिनेता अजय देवगण यासारखे सेलिब्रेटीज सर्व प्रकारच्या ऑनलाइन गेमची दूरदर्शनवर तसेच समाज माध्यमावर जाहिरात करत असतात.(regular)व्यसन लागू शकते, जबाबदारी खेळा, सावधपणे खेळा असा धोक्याचा इशाराही त्यांच्याकडून दिला जातो. ऑनलाइन जंगली रमी मध्ये खेळणाऱ्याला जिंकण्याची संधी सुईच्या अग्रा इतकीही नसते. ऑफलाइन रमी बंदिस्त जागेत सहा जणांमध्ये खेळली जाते आणि त्यामध्ये जिंकण्याची किमान संधी असते. आपल्याकडे नशिबाचा खेळ हा अवैध मानला जातो पण त्याच वेळेला लॉटरी व्यवसायाला परवानगी असते आणि लॉटरी लागणे हा नशिबाचा भाग असतो. केवढा हा विरोधाभास!
गेल्याच महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाने बैल आणि म्हैस खरेदी करण्यासाठी सात लाख रुपये बँकेत अकाउंट वर ठेवले होते. त्या शेतकऱ्याच्या घरातील एका लहान मुलाने मोबाईलवर कोणत्यातरी गेमची बटणे दाबली आणि या शेतकरी कुटुंबाच्या बँकेच्या अकाउंट वरील पाच लाख रुपये गायब झाले. जंगली रमी खेळात एका सहाय्यक फौजराने सर्वस्व गमावले. आणि नंतर तो चक्क चोऱ्या करू लागला. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणालाही अशाच दारुण परिस्थितीला सामोरे जावे लागले. मराठवाड्यातील एका कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्या केली. देशभरात रोज हजारो कुटुंबे देशोधडीला लागत असताना शासनकर्ते मात्र त्यापासून कोणताही धडा घ्यायला तयार नाहीत.
आपणाला जीएसटी मिळतोय ना तर मग सामान्य माणूस खड्ड्यात जाऊ दे अशी मानसिकता शासन चालवणाऱ्यांची झालेली आहे. ऑनलाइन गेम मध्ये कुटुंबे उध्वस्त होत असल्याचे वास्तव समोर आल्यानंतर तामिळनाडू, आंध्र वगैरे तीन राज्यांनी ऑनलाइन गेम ला राज्यात प्रतिबंध केला. (regular)तसा कायदाही पारित केला तथापि उच्च न्यायालयाने या राज्यांनी केलेला कायदाच रद्दबातल ठरवला. कारण रमी हा खेळ कौशल्याचा समजला गेलेला आहे.ऑनलाइन गेम चालवणाऱ्या देशभरात 70 पेक्षा अधिक कंपन्या आहेत.या कंपन्यांच्या माध्यमातून केंद्र शासनाला एक लाख कोटी पेक्षाही अधिक जीएसटी मिळतो. यावरून या ऑनलाइन गेम मध्ये उलाढाल किती होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. भारतीय संस्कृतीचा विचार केला तर ऑनलाईन गेम अर्थात जुगाराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे अनैतिक मानले जाते. आणि राजकारणात साधन सुचिता मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे.

रमी हा सहा जणांमध्ये खेळला जाणारा वैध जुगार आहे. ऑफलाइन रमी हा खेळ धर्मादाय नोंदणीकृत सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून खेळला जातो. कोल्हापूर शहरात असे किमान 100 क्लब आहेत आणि ग्रामीण भागात या क्लब ची संख्या मोठी आहे. ऑफलाइन रमी गेम हा कौशल्याचा खेळ असेल आणि त्याला (regular)न्यायालयाची परवानगी असेल तर मग स्थानिक पोलीस अशा रमी क्लबवर धाड का टाकतात?कोल्हापूर शहरात महाद्वार रोड पासून कसबा गेट पोलीस चौकीच्या जवळपास करवीर नामक एक रमी क्लब आहे आणि तो जवळपास गेल्या पन्नास वर्षांपासून तेथील एका तीन मजली इमारतीमध्ये खेळला जातो. गेल्याच आठवड्यात या क्लब वर पोलिसांनी धाड टाकली आणि 52 पेक्षा अधिक लोकांना अटक केली.
पण पोलिसांच्या पंचनाम्यात रमी खेळ दाखवला गेला नाही तर तीन पानी जुगार दाखवला आहे. कारण तेरा पानांची रमी पंचनाम्यात दाखवता येत नाही कारण तिला परवानगी आहे.ऑफलाइन रमी क्लबला परवानगी देताना उच्च न्यायालयाने काही अटी आणि शर्थी लावलेल्या आहेत. हा रमी खेळ जिथे खेळला जातो तिथे सीसीटीव्ही कॅमेरे असले पाहिजेत. रोख पैसे देऊन हा खेळ खेळता कामा नये, खेळणारा हा क्लब चा सदस्य असला पाहिजे अशा काही अटी तिथे लावल्या गेलेल्या आहेत.
या अटीचे पालन करून रमी क्लब चालवले जातात आणि तरीही पोलिसांना हप्ते द्यावे लागतात. ऑफलाइन रमी मध्ये अनेक कुटुंबांची वाताहत झालेली आहे. त्यामुळे तो कौशल्याचा खेळ मानला गेला असला तरी सामान्य माणूस त्याचे समर्थन करणार नाही. तथापि ऑफलाईन रमीच्या तुलनेत ऑनलाइन जंगली रमी मध्ये फसवणूक असते, जिंकण्याची संधी जवळपास नसतेच. म्हणून केंद्र शासनाने प्रचंड उत्पनावरजनतेच्या हितासाठी पाणी सोडले पाहिजे.
हेही वाचा :
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, तीन दिवसात तिसऱ्या खेळाडूला दुखापत, स्टार खेळाडू संपूर्ण सीरिजमधून बाहेर
कामाची बातमी! आता EPFOची सर्व माहिती मिळणार डिजीलॉकरवर, कसं? वाचा सविस्तर