उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या अहिल्यानगर शहरप्रमुख(chief)किरण काळे यांच्यावर बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एका विवाहित महिलेनं ही तक्रार दाखल केली असून, आरोपी किरण काळेला पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतलं आहे.फिर्यादीत म्हटलं आहे की, पीडित महिला आणि तिच्या पतीमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून मदत मिळावी म्हणून तिचा शहरप्रमुख किरण काळे यांच्याशी संपर्क झाला. मात्र मदतीच्या बहाण्याने किरण काळे याने 2023 ते 2024 दरम्यान आपल्या संपर्क कार्यालयात वारंवार बलात्कार केला, असा आरोप करण्यात आला आहे.

“जर ही गोष्ट कुणालाही सांगितली तर तुला ठार मारेन” – अशा स्वरूपाच्या धमक्याही (chief)आरोपीने दिल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. पीडितेच्या तक्रारीवरून IPC कलम 376 आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहर पोलीस विभागाने किरण काळेला ताब्यात घेतलं असून, सध्या पोलिसांची सखोल चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात आरोपीच्या मोबाईलमधील संवाद, कॉल डिटेल्स, CCTV फुटेज आदी डिजिटल पुराव्यांची छाननी सुरू आहे.या घटनेमुळे आधीच गळतीच्या संकटात असलेल्या ठाकरे गटावर मोठा ताण निर्माण झाला आहे. काही दिवसांपासून ठाकरे गटातील अनेक नेते महायुतीकडे झुकत आहेत, (chief)आणि पक्ष नेतृत्वावर दबाव वाढतो आहे.या घडलेल्या घटनेनंतर ठाकरे गटाची राजकीय आणि नैतिक विश्वासार्हता पुन्हा एकदा चौकटीत आली आहे.
हेही वाचा :
आज मंगळवारी ‘या’ 6 राशींवर प्रसन्न होणार गणराया! मनातल्या इच्छा होतील पूर्ण, आजचे राशीभविष्य वाचा
टीम इंडियावर नवे संकट, तोडावे लागेल इंग्लंडचे ‘चक्रव्यूह’; पिचचा भयानक चेहरा…
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सकारात्मक होणार आज शेअर बाजाराची सुरुवात