साडेसात शिवलिंग असलेले गोंडकालीन प्राचीन जागृतेश्वर मंदिर; शिवालयांमध्‍ये होणार भक्‍तीचा जागर

नागपूर : मंदिरांचे शहर भासावे इतकी मंदिरे असलेल्या नागपुरात(newcastle) जागनाथ बुधवारी येथे गोंडकालीन प्राचीन मंदिर आहे. येथे साडेसात शिवलिंग आहेत. हे मंदिर जागृतेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. १६८०ला याची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. नागपुरात तेव्हा गोंड राजांचे राज्य होते. हे नागपुरातील पहिले शिवमंदिर असून नागपूरचे ग्रामदैवत आहे, अशी काहींची मान्यता आहे.

मंदिर परिसरात एकूण साडेसात शिवलिंग आहेत. यामध्ये मुख्य जागृतेश्वर मंदिर,(newcastle) सभोवती चार शिवलिंग आणि विशेष असे अडीच शिवलिंग असलेले मंदिर, सिद्धीविनायक, काल भैरव, बटुक भैरव, उदासी मठ आणि इतर मंदिरे आहेत. मंदिर परिसरातच संत जागोबा आणि त्यांच्या पत्नी मनाबाईंची समाधीही आहे.

मंदिराविषयी आख्यायिका
बुधवारी परिसरात संत जागोबा नावाच्या सत्पुरुषांचे वास्तव्य होते. तिथे त्यांची (newcastle)कुटी होती. ते दरवर्षी काशी विश्वनाथ येथे दर्शनाला जायचे. पुढे वाढत्या वयोमानानुसार त्यांना काशीला जाणे अशक्य झाले. तेव्हा त्यांना महादेवाने स्वप्नात दृष्टांत देऊन इथेच उत्खनन कर. मी तुला दर्शन देईन, असे सांगितले. या परिसरात गोचराईचे रान होते. संत जागोबांनी उत्खनन सुरू केले आणि त्यांना शिवलिंग सापडत गेले. अशी साडेसात शिवलिंग उत्खननात सापडले. त्यांची स्थापना करण्यात आली, असे सांगितले जाते. पुढे १७३१ मध्ये गोंडराजे बख्त बुलंदशहा यांचे सरदार नागोजी निधी यांनी येथे मंदिर बांधले.

मंदिराचे स्थापत्य
प्राचीन शिल्पकलेचा हे मंदिर उत्तम नमुना आहे. स्थापत्य शास्त्रानुसारच जागृतेश्वर मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिराचा अनेकवेळा जीर्णोद्धार करण्यात आला. राजे भोसनींही या मंदिराला परकोटाची भिंत, बुरुज व सभामंडपही बांधला. होयसळकालीन शिवपार्वतीची उत्कृष्ट शिल्पकृती, महिषासूर मर्दिनी शिल्प इथे आढळते.

जागृतेश्वर मंदिराचे पुजारीपण पंडे कुटुंबाकडे आहे. मंदिर स्थापन तेव्हा आमचे पूर्वज सदाशिवराव पंडे यांच्याकडे मंदिराचे पुजारीपण होते. आज आमची सातवी पिढी मंदिराची सेवा करते आहे.

हेही वाचा :

पावसाळ्यात बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय….
बजेट तयार ठेवा ! Diwali 2025 पूर्वीच ‘या’ 5 धमाकेदार SUVs होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
आजचा पहिला श्रावणी सोमवार राशी ठरणार भाग्यशाली! भोलेनाथांच्या कृपेने आयुष्य बदलणार, आजचे राशीभविष्य वाचा