खेळाची आवड असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.(salary)स्पोर्ट्स फील्डमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सध्या स्पोर्ट्स ऑथोरिटि ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्पोर्ट्स ऑथोरिटीमधील या नोकरीसाठी तुम्ही sportsauthorityofindia.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

तुम्हाला जर स्पोर्ट्समध्ये करिअर करायचे असेल (salary)आणि तुमच्याकडे अनुभव असेल तर ही खूप चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे पुढच्या महिन्याभरात इच्छुकांनी अर्ज करायचे आहे.भारतीय खेळ प्राधिकरण विभागातील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १२ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. ११ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ६४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही ७८८००- २०९२०० रुपये पगार मिळणार आहे.
स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या(salary) उमेदवारांनी केंद्र सरकार/ राज्य सरकार/ सार्वजनिक संस्था किंवा स्वायत्त संस्था / विद्यापीठात काम केलेले असावे. याचसोबत ऑल्मिपिकमध्ये सहभागी झालेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. दरम्यान, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून खेळाशी संबंधित ३ वर्षांच्या कोचिंगचा अनुभव घेतलेला असावा. या नोकरीबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अधिसूचना पाहू शकतात.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्ही sportsauthorityofindia.gov.in वर जा.
तिथे तुम्हाला चीफ कोच भरतीमध्ये (salary)अप्लाय ऑनलाइन असे दिसेल त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला ईमेल आयडी टाकून माहिती भरायची आहे.
यानंतर तुम्हाला तुमचे मार्कशीट, शैक्षणिक सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे.
यानंतर पासपोर्ट साइज फोटो आणि सही अपलोड करुन फॉर्म सब्मिट करायचा आहे.
हेही वाचा :
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
इचलकरंजी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी…
WhatsApp Call वर बोलताना तुमचं लोकेशन होईल ट्रॅक, आत्ताच करा ही सेटिंग