उद्योगपती अंबानींच्या अडचणीत वाढ! ED कडून ‘लुकआऊट’ नोटीस; चौकशीसाठी धाडले समन्स

ईडीने काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर आले होते.(places) त्यानंतर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

१. अनिल अंबानींच्या अडचणीत वाढ
२. ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी
३. काही दिवसांपूर्वी ईडीकडून अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केल्याचे समोर आले होते.(places)
देशातील उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण ईडीने त्यांच्याविरुद्ध ‘लुकआऊट’ नोटीस जारी केली आहे. ३ हजार कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना चौकशीचे समन्स धाडले आहे. त्यामुळे ५ ऑगस्ट रोजी अनिल अंबानी यांची ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याने अनिल अंबानी आता कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाच्या बाहेर जाता येणार नाही.

ईडीने काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर आले होते.(places) त्यानंतर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्यांच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली असून, चौकशीसाठी समन्स देखील धाडले आहे. हे प्रकरण ३ हजार कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित असल्याचे समजते आहे.

नेमके प्रकरण काय?

अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपनीच्या एका योजनेअंतर्गत सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. बँकेकडून मिळालेले तीन हजार कोटींचे कर्ज चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आले असे त्यांच्यावर आरोप आहे. कर्ज मिळण्याच्या आधी बँकेच्या प्रमोटर्सशी संबंधित कंपन्यांना पैसे दिले गेले असा संशय ईडीला आहे. त्यामुळे ईडीकडून आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

बँकेने कर्जाची रक्कम अनिल अंबानी यांच्या कंपन्यांना देताना नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यामुळे या कर्ज प्रकरणाची चौकशी आता ईडीकडून केली जात आहे. यासाठी अनिल अंबानी यांची ५ ऑगस्ट रोही चौकशी होण्याची शक्यता आहे.

ईडीने केली होती छापेमारी

काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांवर छापेमारी केल्याचे समोर आले होते. तपास यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि संगणक उपकरणे जप्त केली. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, ईडीने २४ जुलै रोजी ३००० कोटी रुपयांच्या बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई छापेमारी केल्याचे समोर आले होते.

हेही वाचा :

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष