शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; खात्यात 2000 रुपये जमा होणार

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे.(farmers)त्यांनी आता मोबाईलवर मॅसेज चेक करावा. कारण अगदी थोड्याच वेळात त्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा झाल्याचा मॅसेज येऊन धडकणार आहे. त्यांच्या मॅसेजची रिंगटोन ऐकू येईल. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 20 वा हप्ता आज जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. थोड्याचवेळात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता जमा होईल.पीएम किसान सन्मान निधीच्या 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आज, 2 ऑगस्ट रोजी जमा होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसीमध्ये आहे. सकाळी 11 वाजता कार्यक्रमात ते विविध विकास योजनांचे उद्धघाटन करतील. त्याचवेळी ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जमा करतील. अगदी थोड्याच वेळात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता पात्र शेतकर्‍यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. (farmers)तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

तरच खात्यात पैसा येईल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्‍यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. PM Kisan हेल्पलाईन 155261 वा 011-24300606 येथे कॉल करावा.या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये जमा केले.(farmers) DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा होती. जुलै महिन्यात हा हप्ता जमा होण्याची शक्यता होती. त्यावेळी रक्कम जमा झाली नाही. आज 2 ऑगस्ट रोजी 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बँक हस्तांतरीत करण्यात येईल.

ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही. इनकम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.

पीएम किसान मोबाईल एपवर, फेस ऑथेंटिकेशन फीचर येते.

याठिकाणी शेतकरी घरबसल्या ई-केवायसी करता येते.

त्यासाठी फिंगरप्रिंट आणि ओटीपी गरज नसेल.

हेही वाचा :

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष