मागील ५०० वर्षांपासून जिनसेन मठ नांदणी यांचेकडून हत्ती पाळण्यात आले आहेत.(elephants)पेटा या संस्थेने या मठाची बदनामी करण्यास सुरवात केली आहे. नांदणी मठाने या हत्तीकडून भीक गोळा करण्यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पेटा ही संस्था अंबानीची बटीक व दलाल झाली आहे. पेटा संस्थेने आजपर्यंत सर्व बेकायदेशीर व खोटे रिपोर्ट तयार करून अंबानीच्या वनतारा येथे हत्ती पाठविण्याचा कट रचला आहे. अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.

ज्या माधुरी उर्फ महादेवी या हत्तीवर महाराष्ट्र व कर्नाटकातील जनतेने जीवापाड प्रेम केले तिचा ३३ वर्षांपासून सांभाळ केला. तिला बदनाम करण्याची सुपारी पेटा या संस्थेने घेतली आहे. माधुरी हत्ती शारीरीक सदृढतेसाठी दररोज २० ते २५ किलोमीटर नांदणी मठाच्या परिसरातील गावात फेरफटका मारायची.यावेळी परिसरातील लोक श्रध्देने व भावनेने माधुरीला केळी, फळे, चारा किंवा १० -२० रूपये देवून तीचा आशिर्वाद घेत असत ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. अंबानीची बटीक व दलाल झालेल्या पेटाने अशा पध्दतीने बदनामी थांबवावे. असे शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

‘महादेवी हत्तीणीला नांदणी मठाकडे परत पाठविण्यासाठी गुजरातच्या वनतारा वन्यजीव काळजी व संवर्धन केंद्राने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परंतु, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकार व वनतारा प्रशासनाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे.(elephants)त्यानंतर लवकरच महादेवीला परत आणू’, असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.बैठकीत मठाधिपती भट्टारक महास्वामी यांनी महादेवी हत्तीणीला परत द्यावे, अशी भूमिका मांडली. यावर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यास महादेवीला पुन्हा नांदणीला पाठविण्यास तयार असल्याचे विहान करणी यांनी सांगितले. त्यानंतर महास्वामी बाहेर पडले. त्यानंतर ते नाराज असल्याबाबत तर्कवितर्क मांडले जाऊ लागले. परंतु याबाबत पालकमंत्री यांना विचारले असता त्यांनी महास्वामी नाराज नसल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील आजरा, भुदरगड, चंदगड तालुक्यात हत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन जीवाला धोकाही निर्माण होतो. त्यामुळे अशा हत्तींना वनतारा केंद्राने घेऊन जावे,(elephants) अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार वनतारा केंद्राचे पथक या ठिकाणी येऊन हे हत्ती घेऊन जातील, असे आश्वासन देण्यात आले आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले
हेही वाचा :
भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष