आनंदवार्ता, सलग पाचव्यांदा गॅस सिलेंडर स्वस्त; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींविषयी(cylinders) मोठी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सलग पाचव्यांदा घसरण झाली. सरासरी 34 रुपयांनी किंमती स्वस्त झाल्या. मार्च महिन्यापासून आतापर्यंत सलग पाच महिन्यात 170 रुपयांची घसरण आली. जागतिक बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने किंमती घसरल्या आहेत.

भारतभर गॅस सिलेंडरच्या किंमतीत घसरण दिसून आली. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती जैसे थे आहेत. एप्रिल महिन्यात यापूर्वी घरगुती गॅसच्या किंमतीत बदल दिसून आला होता. एप्रिल महिन्यात मोदी सरकारने घरगुती गॅसच्या किंमतीत 50 रुपयांची दरवाढ झाली होती. (cylinders) तेव्हापासून त्यात कपात झालेली नाही. तर दुसरीकडे सलग पाचव्यांदा व्यावसायिक गॅसच्या किंमतीत मोठी कपात दिसून आली.

IOCLच्या आकडेवारीनुसार, देशाच्या राजधानीसह चार महानगरातील व्यावसायिक गॅसच्या किंमतीत सलग 5 व्या महिन्यात घसरण दिसून आली. देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 33.5 रुपयांची घसरण दिसली. आता हा भाव 1631.50 रुपयांवर आला आहे.(cylinders) तर मुंबईत व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 34 रुपयांची घसरण झाली. आर्थिक राजधानीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1582.50 रुपयांवर आली. कोलकत्ता आणि चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 34.5 रुपयांची कपात झाली. दोन्ही शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरची क्रमशः 1734.50 आणि 1789 रुपये अशी किंमत आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत एप्रिल महिन्यानंतर कोणताच बदल झाला नाही. एप्रिल महिन्यात किंमतीत 50 रुपयांची दरवाढ झाली होती. 8 एप्रिल रोजी मोदी सरकारने याविषयीची घोषणा केली होती. त्यानंतर किंमतीत कोणताही बदल दिसला नाही. IOCL च्या आकड्यांनुसार, चार मोठ्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जैसे थे आहे. यामध्ये दिल्लीत 853 रुपये, कोलकातामध्ये 879 रुपये, मुंबईमध्ये 852.50 आणि चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरची किंमत 868.50 रुपये इतकी आहे. जागतिक बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमती कमी झाल्याने व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा :

भारतातील असे 3 शिवमंदिर जिथे मिळते खाण्यापिण्याची आणि राहण्याची फ्री सुविधा; यंदाच्या श्रावणात एकदा नक्की भेट द्या
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा
“संशया”वरून दोष सिद्धी नाही “मालेगाव स्फोट”आरोपी निर्दोष