जो रुट याने अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी कसोटी मालिकेत तिसरं(series) शतक झळकावलं. रुटने यासह या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 500 धावांचाही टप्पाही ओलांडला.

इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा असणारा अनुभवी फलंदाज जो रुटने या कसोटी क्रिकेटमधील धावा करण्याचा झंझावात कायम राखत इतिहास घडवला आहे. जो रुटने केनिंग्टन ओव्हलमध्ये टीम इंडिया(series) विरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात दमदार शतक ठोकलं. रुटने विजयी धावांचा पाठलाग करताना ही कामगिरी केली. रुटने एकूण 105 धावा केल्या. इंग्लंडच्या फलंदाजाने या खेळीत 12 चौकार लगावले. रुटचं हे कसोटी कारकीर्दीतील 39 वं शतक ठरलं. रुटने यासह श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा याला मागे टाकलं. रुटने संगकाराला कसोटीतील शतकांबाबत मागे टाकलं. रुटने संगकाराचा 38 शतकांचा विक्रम मोडला.

रुटचं भारताविरुद्धचं केनिंग्टन ओव्हलमधील हे 13 वं कसोटी शतकं ठरलं. रुटने यासह ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ आणि इंग्लंडच्या जॅक हॉब्स यांना मागे टाकलं. या दोघांनीही एकाच संघाविरुद्ध प्रत्येकी 12-12 शतकं लगावली होती. तर रुटने या 13 व्या शतकासह भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील(series) गावसकर यांच्या 13 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. रुटआधी गावसकरांनी एकाच संघाविरुद्ध 13 शतकं लगावली होती. गावसकरांनी वेस्ट इंडिज विरुद्ध हा कारनामा केला होता. तर एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक 19 शतकांचा विक्रम ऑस्ट्रेलियाचे दिग्ग्ज माजी फलंदाज सर डॉन ब्रॅडमॅन यांच्या नावावर आहे. ब्रॅडमॅन यांनी इंग्लंड विरुद्ध 19 शतकं झळकावली होती.
रुटची वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
रुटने इंग्लंडमध्ये लगवलेलं हे 24 वं कसोटी शतक ठरलं. रुटने यासह वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. रुट एका देशात सर्वाधिक कसोटी शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला. रुटने यासह रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस, महेला जयवर्धने या माजी त्रिकुटाला मागे टाकलं. या तिघांनी मायदेशात प्रत्येकी 22-22 शतकं लगावली होती.

5 वर्षांत 22 शतकं
दरम्यान जो रुटने याने गेल्या 5 वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रुटने गेल्या 5 वर्षांपासून सातत्याने खेळतच नाहीय तर धावाही कुटतोय. रुटने कसोटीतील 39 पैकी 22 शतकं ही गेल्या 5 वर्षात लगावली आहेत. यावरुन रुट काय खेळलाय याचा अंदाज बांधता येतो. रुटने यासह केव्हाच फॅब 4 मधील उर्वरित तिघांना मागे टाकलं. कसोटीत स्टीव्हन स्मिथ याने 36, केन विलियमसन 33 आणि विराट कोहली याने 30 शतकं झळकावली आहेत.
हेही वाचा :
श्रावणी सोमवार विशेष : मराठा स्थापत्य शैलीचा ठेवा; पुण्यातील उमा महेश्वर मंदिर
फुल्ल टॅंकवर 700 KM ची रेंज ! लाँच होताच ‘या’ बाईकने दाखवला जलवा, फक्त 10 हजारात करता येईल बुक
आजचा श्रावणी सोमवार राशींसाठी भाग्यशाली! महादेवांचा भक्कम पाठिंबा, नशीबाची साथ, आजचे राशीभविष्य वाचा