सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी पाठ फिरवली. सिनेमा हाऊसफुल्ल चालेल, असं वाटलेलं पण सिनेमा (Cinema)पाहायला थिएटरकडे प्रेक्षक वळलेसुद्धा नाहीत. आता यावर खुद्द दिग्दर्शक केदार शिंदेनी भाष्य केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता, रिलस्टार सूरज चव्हाणचा काही दिवसांपूर्वी ‘झापुक झुपूक’हा मराठी सिनेमा प्रदर्शित झालेला.

सूरज बिग बॉस मराठीच्या घरात असताना प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावरु उचलून घेतलं होतं. सूरजची फॅनफॉलोविंग इतर स्पर्धकांवर प्रचंड भारी पडलेली. त्यामुळेच सूरजचा सिनेमा सुपरडुपर हिट ठरणार, असंच समजलं जात होतं. पण, प्रत्यक्षात सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मात्र, असं काही घडलंच नाही.

सूरज चव्हाणनं बिग बॉसची ट्रॉफी उंचावल्यानंतर त्याच मंचावरुन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याच्यासोबत सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली. तेव्हापासूनच या सिनेमाची(Cinema) चर्चा रंगलेली. त्यामुळे हा सिनेमा हिट ठरणार, बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणार असल्याचं जवळपासून निश्चित असल्याचंच मानलं जात होतं.

दणक्यात प्रमोशनही झालेलं… पण, प्रत्यक्षात मात्र, असं काहीच घडलं नाही. सिनेमा(Cinema) रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी पाठ फिरवली. सिनेमा हाऊसफुल्ल चालेल, असं वाटलेलं पण सिनेमा पाहायला थिएटरकडे प्रेक्षक वळलेसुद्धा नाहीत. आता यावर खुद्द दिग्दर्शक केदार शिंदेनी भाष्य केलं आहे.
मुक्कामपोस्ट मनोरंजनला’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केदार शिंदे म्हणाले की, “मला वाटतंय कदाचित माझ्या विचारांतच काहीतरी खोट असेल, सिनेमा लोकांनी पाहिलाच नाही… त्यांना सूरज चव्हाणला अभिनेता म्हणून बघायचाच नसेल… त्यांनी ती गोष्ट नाकारली…”
“मूल जन्माला घातल्यानंतर दहा दिवसांनी समजतं की, त्याचा मृत्यू झालाय… तेव्हा जे दु:ख होतं, तेच दु:ख आपल्या एखाद्या कलाकृतीचं अपयश एका दिग्दर्शकाला पाहून होतं… ते दहा दिवस अत्यंत त्रासदायक असतात… जर ते नसेल तर मग आपण सृजनशील कलावतं नाहीत आहोत, आपल्याला त्याचं दु:ख व्हायलाच पाहिजे… पण, मी असा विचार नाही करू शकत की, प्रेक्षकांना अक्कल नाही.
उलट ज्यांनी मला नाकारलं, त्यांच्याकडेच कदाचित जास्त अक्कल आहे… आता त्यांच्या मनात मी माझं स्थान कसं निर्माण करणार, याचेच माझ्याकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्या चुका आधी केल्यात त्या पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेतो… कारण, यशाचा कोणताच फॉर्म्युला नाही…”
दरम्यान, मराठीतील दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमामध्ये सूरज चव्हाणसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे अशी तगड्या कलाकारांची स्टारकास्ट होती. या चित्रपटासाठी प्रत्येक कलाकारानं प्रचंड मेहनत घेतली होती. तसेच, या सिनेमाचं दणक्यात प्रमोशनही करण्यात आलेलं. पण, प्रत्यक्षात सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आदळला.
हेही वाचा :
70 वर्षांनंतर हॅरी ब्रूकने केला हा मोठा पराक्रम, असे करणारा तो तिसरा फलंदाज
श्रावणातील आजच्या सोमवारी रात्रीच्या वेळेस करा ‘हे’ उपाय; प्रत्येक काम यश मिळेल नक्की
लवकरच होणार मोठा धमाका! या महिन्यात लाँच होणार हे दमदार 5G स्मार्टफोन्स, Google Pixel चा असणार समावेश