महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरात आणण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे.(update)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही आठवड्यांपासून कोल्हापूरकरांकडून सुरू असलेल्या आंदोलन आणि भावनिक लाटेनंतर आता सरकारने हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, महादेवी हत्तीण वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारचा नव्हता, तो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे घेतला गेला. मात्र आता जनभावनेचा आदर करून हत्तीण परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे.

बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत सांगितले की, “नांदणी मठाने एक याचिका दाखल करावी, आणि राज्य सरकारही आपली याचिका सुप्रीम कोर्टात सादर करेल. हत्तीणच्या निगा राखण्यासाठी डॉक्टरांची आणि अधिकाऱ्यांची एक विशेष टीम राज्य सरकारकडून नियुक्त केली जाईल.(update)”आहार, आरोग्य, रेस्क्यू सेंटर व्यवस्थापन याबाबतही राज्य सरकार सुप्रीम कोर्टासमोर ठोस आश्वासन देणार आहे. यामुळे महादेवी हत्तीण पुन्हा कोल्हापूरात आणण्याच्या दृष्टीने सरकारकडून सकारात्मक पुढाकार सुरू झाला आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांतदादा पाटील, प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, गणेश नाईक यांसारखे राज्याचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. तसेच शेतकरी नेते राजू शेट्टी, सतेज पाटील, सदाभाऊ खोत, धैर्यशील माने, प्रकाश आवाडे यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते.“३४ वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात आहे, ती परत यावी ही आपली सामूहिक इच्छा आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. त्यांच्या वक्तव्यामुळे कोल्हापुरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महादेवी हत्तीणीच्या पाठपुराव्यासाठी कोल्हापूरकरांनी जिओच्या डिझेल-पेट्रोल पंप आणि टेलिकॉम सेवेवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे सामाजिक दबावही मोठ्या प्रमाणात वाढला होता.या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका आता जनतेच्या बाजूने वळली आहे.(update)सर्वोच्च न्यायालयात सरकार स्वतःची भूमिका मांडून नांदणी मठाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापुरात हत्तीण परत येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
तरुणाईला जॅकपॉट! केंद्र सरकारकडून… नोकरीसंदर्भातील सर्वात मोठी, निश्चिंत करणारी बातमी
डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचा करा वापर, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो
ओव्हल टेस्ट जिंकवणाऱ्या सिराजचा भाव वाढला, BCCI कडून किती पैसे मिळणार ?