नांदणी ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथील जनतेच्या जिव्हाळ्याची (meets)बनलेली महादेवी हत्तीण पुन्हा आपल्या मूळ स्थळी परत यावी, यासाठी हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील खासदार, आमदार, तसेच स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्यासह विविध प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “महादेवी हत्तीण ३४ वर्षांपासून नांदणी मठात आहे. तिची घरवापसी ही आपली सामूहिक इच्छा आहे. या निर्णयासाठी राज्य सरकार आणि मठ संयुक्तपणे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहेत.”यासोबतच वनतारा प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. वनताराचे वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मुंबईत झालेल्या चर्चेत, वनताराने स्पष्ट केले की त्यांनी केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. (meets) हत्तीणीचा ताबा घेण्यामागे त्यांचा कोणताही स्वारस्यपूर्ण हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
वनताराच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आश्वासन दिले की, “महादेवी हत्तीण माधुरी सुखरूपपणे पुन्हा नांदणी मठात परत येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल करावयाच्या याचिकेमध्ये आम्ही सहकार्य करू. तसेच मठाजवळच वन विभागाने निवडलेल्या जागेवर पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या राज्य सरकारच्या उपक्रमालाही आम्ही सर्वतोपरी मदत करू.”त्यांनी पुढे सांगितले की “आम्ही कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला नाही. त्या भावना आम्ही मानतो आणि त्याचा आदर करतो.“

या निर्णयामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनतेमध्ये समाधानाची भावना असून, महादेवीच्या पुनरागमनासाठी आता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकार, मठ, आणि वनतारा यांच्यातील सहकार्यामुळे हे आंदोलन कायदेशीर मार्गाने यशस्वी होण्याची आशा अधिक बळकट झाली आहे.राज्य सरकारकडून लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाईल. (meets)त्यानंतर न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा करण्यात येईल.
हेही वाचा :
सासऱ्याने केली अशी गोष्ट… वर्षा उसगांवकर यांच्या खासगी आयुष्यात अनेक वादळ
आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान
आम्ही तुम्हाला डिजीटल अरेस्ट करतोय, एक व्हिडीओ कॉल आणि… नाशिकमध्ये त्या चार लोकांसोबत काय घडलं?