कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. UPI आणि ATM च्या माध्यमातून थेट भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्याची बहुप्रतीक्षित सुविधा सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, ही योजना रद्द करण्यात आलेली नसून तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर ती लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

EPFO सध्या आपल्या डिजिटल सेवांचे आधुनिकीकरण करण्यासाठी CITES 2.01 (Centralised IT Enabled Services) हे नवे आयटी प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. या प्रणालीमुळे PF संदर्भातील सर्व सेवा अधिक जलद, सोप्या आणि पूर्णपणे डिजिटल करण्याचा उद्देश आहे. मात्र, (Organisation) नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर अनेक सदस्यांना विविध तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नवीन पोर्टलवर लॉगिन करण्यात अडचणी, EPF खात्याचा डेटा न दिसणे, वेबसाइटचा वेग कमी असणे आणि PF क्लेम प्रक्रियेत होणारा विलंब अशा अनेक तक्रारी सदस्यांकडून करण्यात आल्या आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी EPFO कडून युद्धपातळीवर काम सुरू असून, पोर्टल पूर्णपणे स्थिर झाल्यानंतरच UPI-Linked Claim Settlement सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Organisation) मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बहुतांश तांत्रिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर UPI आधारित क्लेम सेटलमेंट सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू केली जाऊ शकते. मात्र, या संदर्भात EPFO कडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
EPFO 3.0 अंतर्गत सदस्यांना अनेक डिजिटल सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये PF क्लेमची प्रक्रिया अधिक वेगवान होईल, कागदपत्रांची आवश्यकता कमी होईल, (Organisation) सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध होतील आणि भविष्यात UPI तसेच ATM च्या माध्यमातून PFची रक्कम काढण्याची सुविधाही सुरू होणार आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर सदस्यांना EPFO कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ होईल.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?