निवडणूक प्रचाराचे फटाके आता दिवाळीनंतरच फुटणार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांपासून बहु प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य(fireworks)संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बार आता दिवाळीनंतर फुटणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी डिसेंबर ते जानेवारी यादरम्यान टप्प्याटप्प्याने या निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केल्यामुळे उलट सुलट राजकीय चर्चांना उधाण येणार आहे. 27 महानगरपालिका, 34 जिल्हा परिषदा, 232 नगर परिषदा, 125 नगरपंचायती आणि 225 नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून खोळंबलेल्या आहेत.

कोरोना, लॉकडाऊन, यामुळे निवडणुका रखडल्या होत्या. कोरोना संपुष्टात आल्यानंतर ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला निर्णय, निवडणुका एका सदस्य किंवा त्रि सदस्य,की चार सदस्य पद्धतीने घ्यायच्या याबद्दलचा शासन पातळीवरचा घोळ आदी कारणामुळे या निवडणुका लांबत गेलेल्या होत्या. आता सर्व प्रकारचे अडथळे दूर झाल्यामुळे या निवडणुका घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे, मात्र त्या निवडणुका नेमक्या केव्हा घेतल्या जाणार याबद्दल संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते. आता हा संभ्रम राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दूर केला असला तरी निवडणुकांच्या अर्थात मतदानाच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेता येणे शक्य नाही. कारण तेवढे शासकीय आणि निमशासकीय मनुष्यबळ उपलब्ध नाही. या निवडणुकीत मतदानाच्या वेळी व्हीव्हीपॅट मशीन वापरले जाणार नाही, कारण ते तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे आहे असे निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.(fireworks) आता या दोन बाबी बद्दल राजकारणात उलट सुलट चर्चा होणार आहे. आणि त्याला सुरुवातही झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार आहेत याचा कालावधी सांगितला असल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे.

आपण ज्या उमेदवाराला मत दिलेले आहे, ते त्यालाच मिळालेले आहे काय याची खात्री व्ही व्ही पॅट मशीनच्या माध्यमातून मतदाराला करता येते. पण हे मशीन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला वापरण्यात तांत्रिक अडचणी येत नाहीत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे हे मशीन वापरण्यात अडचणी येतात असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले असले तरी विरोधी पक्षांकडून आयुक्तांच्या या निर्णयाला विरोध केला जाऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या निवडणुका इसवी सन 1952 मध्ये संपन्न झाल्या होत्या. त्याची मतमोजणी आणि प्रत्यक्ष निकाल जाहीर करायला तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागलेला होता.

व्हीव्हीपॅट मशीन वापरायचे झाले तर तसाच विलंब होऊ शकतो.(fireworks)पण तेव्हा आजच्या इतके विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित झालेले नव्हते. आज प्रगत ज्ञान आहे असा युक्तिवाद विरोधी पक्षांकडून केला जाऊ शकत निवडणुका होण्यासाठी तब्बल चार महिन्यांचा कालावधी असल्यामुळे महाविकास आघाडी, महायुती, वंचित आघाडी तसेच अन्य राजकीय पक्षांना जागावाटप, उमेदवारांची निवड, प्रचार वगैरे तयारी करण्यास भरपूर वेळ मिळणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारीचे कार्ड अद्याप ओपन केलेले नाही.कारण नजीकचा काळ हा सणासुदीचा आहे, उत्सवांचा आहे, उमेदवारी जाहीर केली तर खिशाला अतिरिक्त ताण आधीपासूनच पडणार आहे असा विचार करून अनेक इच्छुकांनी आपले कार्ड आत्ताच ओपन करायचे नाही असे ठरवलेले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका आणि नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती अशा पाच टप्प्यात या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. एकूणच आधी दीपावली सणाचे आणि नंतर निवडणूक प्रचाराचे फटाके फुटतील.

हेही वाचा :

सासऱ्याने केली अशी गोष्ट… वर्षा उसगांवकर यांच्या खासगी आयुष्यात अनेक वादळ
आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान
आम्ही तुम्हाला डिजीटल अरेस्ट करतोय, एक व्हिडीओ कॉल आणि… नाशिकमध्ये त्या चार लोकांसोबत काय घडलं?