कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
भारत म्हणजे बांगलादेशातील रोहिंग्या आणि तत्सम मुसलमानांसाठी (place) “आओ जाओ घर तुम्हारा”असा बनला आहे. कोल्हापूर सारख्या शहरात परप्रांतीय म्हणून बंगाली सुवर्ण कारागिरांनी यायला सुरुवात केली त्याला 30 पेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लोटून गेला आहे. बंगालीच्या नावाखाली किती बांगलादेशी आले आणि इथेच स्थायिक झाले हे कळण्यास मार्ग नाही. चारच दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या आराम कॉर्नर परिसरात एका झोपडपट्टी सदृश्य भागात 25 पेक्षा अधिक मुस्लिमांना जुना राजवाडा पोलिसांनी ते बांगलादेशी असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले.त्यांच्याकडे आधार कार्ड बनावट होते. ते भारतीय असल्याचा कोणताही अधिकृत पुरावा त्यांच्याकडे नव्हता. सध्या त्यांच्याकडे तपास सुरू आहे. एकूणच बांगलादेशातील कोट्यावधी लोकांनी भारतात घुसखोरी करून स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगार बळकावला आहे.

बांगलादेशची निर्मिती भारताने केली. भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तान (place) स्वतंत्र केला. इसवी सन 1971 मध्येच बांगलादेश स्वतंत्र झाला. पाकिस्तानच्या लष्कराने मुजिबूर रहमान यांच्या पूर्व पाकिस्तानवर अनन्वित अत्याचार केले, लक्षावधी लोकांना ठार मारलेहा इतिहास आजच्या तेथील पिढींला माहिती नाही. बांगलादेशची निर्मिती करण्यासाठी भारताने किती प्रयत्न केले हे उपकार स्मरणात आणून देणारे मागची पिढी आज राहिलेली नाही त्यामुळे आजच्या तरुण पिढीला भारताचे उपकार माहित नाहीत. म्हणूनच गेल्या वर्षभरापासून आणि त्याच्या आधीपासूनही बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत, हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू आहेत.बांगलादेश मधील अल्पसंख्यांक असलेला हिंदू समाज असुरक्षित बनला आहे. हिंदू तरुणांना जिवंत जाळले जात आहे. या अशांत पार्श्वभूमीवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावग्रस्त बनले आहेत.आज बांगलादेशमध्ये प्रचंड अस्थिरता आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होताना दिसतो आहे.टंचाई निर्माण झाली आहे.
उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. शेख हसीना यांच्या काळातील (place) बांगलादेश आता उरलेला नाही. त्याची वाटचाल पाकिस्तान प्रमाणे सुरू आहे. अशावेळी बांगलादेश मधून भारतात घुसखोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, वाढत चालली आहे आणि येथून पुढे वाढणारच आहे. कारण सीमेवर कुंपण नसल्याने भारतात येणे फारसे कठीण नाही.भारत आणि बांगलादेश यांच्यामधील सीमा 4000 किलोमीटर लांबीची आहे. आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा वगैरे राज्यांशी ती जोडलेली आहे. चार हजार किलोमीटर लांबीच्या सीमेवर571 किलोमीटर लांबीची सीमा अद्यापही सीलबंद केलेली नाही, तिला कुंपण घातलेले नाही. ही सीमा पश्चिम बंगालशी संबंधित आहे आणि तेथील ममता बॅनर्जी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने 571 किलोमीटर पर्यंतची सीमा बंदिस्त केव्हा करणार, कुंपण कधी घालणार अशी विचारणा अनेकदा केली होती. प्रतिज्ञापत्र ही सादर करण्यास सांगितले होते. तथापि ममता बॅनर्जी सरकारने या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. 571 किलोमीटरच्या सीमेवर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही म्हणजेच बांगलादेशी लोकांना भारतात येण्यासाठी तेथील सरकारने मुक्त द्वार भूमिका घेतलेली आहे.
या सीमेवर कोणत्याही प्रकारचा पहारा नाही, बंदोबस्त नाही,त्यामुळे येणे (place) जाणे सहज बनले आहे.भारतीय नागरिकत्व कायद्यामध्ये सुधारणा केल्यानंतर, बांगलादेश ला लागून असलेल्या राज्यांमध्ये बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांची प्रचंड संख्या असल्याचे कागदपत्री सिद्ध झाले आहे. आता या मंडळींना त्यांच्या देशात पाठवायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
बांगलादेशातील घुसखोरांना महाराष्ट्र आवडतो आहे. मुंबई आवडती आहे.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सारखे शहर आवडते आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात बांगलादेशींची शोध मोहीम सुरू आहे. त्यांना शोधून काढून त्यांच्या देशात पाठवले जात आहे. काही महिन्यापूर्वी कोल्हापुरातील एका उपनगरात दोन बांगलादेशी महिला राहत असल्याचे उघड झाले होते. त्यांच्यावर कायदेशीर रित्या कारवाई करण्यात आली. आता तर 25 पेक्षा अधिक जणांना ते बांगलादेशी असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले आहे.

बांगलादेशी भारतात येतात. मिळेल ती मजुरी करतात. (place) काही कालावधीनंतर लाच देऊन शिधापत्रिका बनवून घेतात, शिधापत्रिकेच्या माध्यमातून इतर ओळख कागदोपत्री तयार केली जाते. आणि मग हे मतदार याद्यांमध्ये घुसतात आणि मतदार बनतात. त्यांना अशा प्रकारचे आयडी प्रूफ मिळवून देणारी एक यंत्रणा आहे.सुमारे 40 वर्षांपूर्वी आसाम मध्ये खुलेआमपणे बांगलादेशी नागरिक येत होते. रहात होते, भारतीय नागरिकत्वाची ओळख बनावटगिरीने मिळवत होते.या घोशखोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींनी. त्यांनी हा विषय देशभर चर्चेत आणला. आजही तेथे लाखोच्या संख्येने बांगलादेशी आहेत.571 किलोमीटरच्या सीमेवर कुंपण घातले नाही, तेथे बंदोबस्त तैनात केला नाही तर भारतातच दुसरे एका बांगलादेशाची निर्मिती होऊ शकते.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश