कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर”वेडा तुघलक”या नावाचे एक नाटक(Drama)कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : काही वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर”वेडा तुघलक”या नावाचे एक नाटक आले होते.एक निर्णय घ्यायचा, त्याची अंमलबजावणी झाली की पहिला निर्णय रद्द करून दुसराच निर्णय घ्यायचा. त्यांनी आपल्या राज्याची राजधानी सुद्धा तो बदलायचा अशी या तुघलकाची खासियत होती.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाहिले तर या वेड्या तुघलकाची आठवण येते. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर काही दिवसातच या महाशयांची जगावर दादागिरी सुरू झाली आहे.आपण संपूर्ण जगाचे एकमेव पोलीस आहोत, आणि जगाने आपल्या ऐकलेच पाहिजे असा अट्टाहास असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबेल पारितोषिक हवे आहे यासारखा दुसरा जागतिक विनोद नसावा.
आले होते.एक निर्णय घ्यायचा, त्याची अंमलबजावणी झाली की पहिला निर्णय रद्द करून दुसराच निर्णय घ्यायचा. त्यांनी आपल्या राज्याची राजधानी सुद्धा तो बदलायचा अशी या तुघलकाची खासियत होती.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाहिले तर या वेड्या तुघलकाची आठवण येते. यावर्षीच्या जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर काही दिवसातच या महाशयांची जगावर दादागिरी सुरू झाली आहे.आपण संपूर्ण जगाचे एकमेव पोलीस आहोत, आणि जगाने आपल्या ऐकलेच पाहिजे असा अट्टाहास असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबेल पारितोषिक हवे आहे यासारखा दुसरा जागतिक विनोद नसावा.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहेलगाम दहशतकांडानंतर जे अल्पकाळाचे अघोषित युद्ध झाले आणि जे भारताने जिंकले त्या युद्धात माझ्यामुळे दोन्ही राष्ट्रांनी शस्त्र संधी केली असेही त्यांनी जाहीर केले आणि पुन्हा मी या अघोषित युद्धात हस्तक्षेप केला नाही, शस्त्रसंधीसाठी मी प्रयत्न केले नाहीत असेही सांगून स्वतःच पूर्वी केलेला दावा खोडून काढला. या अघोषित युद्धात शस्त्रसंधी करण्यासाठी कोणत्याही राष्ट्राप्रमुखाचा हस्तक्षेप नव्हता किंवा सहभाग नव्हता.पाकिस्तानच्या सेना अधिकाऱ्याने विनवणी केली आणि ती आम्ही मान्य केली हा भारताच्या वतीने खुलासा केल्यानंतरही पुन्हा माझ्यामुळेच शस्त्र संधी झाली असे ट्रम्प महाशयांनी जगाला सांगून टाकले आहे.

रशियाने युक्रेनशी सुरू केलेले युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी अल्टिमेटम दिला असून तो शुक्रवारी संपणार आहे. युद्धबंदीची आठवण करून देण्यासाठी ट्रम्प यांनी पुतीन यांच्याकडे आपला एक दूतही पाठवला आहे(Drama).रशियाकडून कच्चे तेल मोठ्या प्रमाणावर खरेदी करून भारत हा अप्रत्यक्षपणे ब्लादेमीर पुतीन यांना युक्रेनशी युद्ध करण्यासाठी रसद पुरवतो आहे म्हणून ट्रम्प यांनी भारतावर आधीच्या 25% टेरिफ वर आणखी 25% वाढवले आहेत. रशियाकडून तेल खरेदी बंद करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा संदेश त्यांनी भारताला दिला आहे आणि भारताने खुद्द अमेरिका रशियाकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो आहे याची आठवण करून दिली आहे. रशियाकडून आपण खरेदी करायची आणि इतर देशांना मात्र मनाई करायची हा कुठला न्याय? ही वस्तुस्थिती भारताने समोर आणल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मला काही माहिती नाही अशी बचावात्मक भूमिका घेतलेली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर दबाव टाकला जातो आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर काही बोलावयास तयार नाहीत अशी टीका इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सध्या केली जाऊ लागली आहे. पण दोन दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वदेशीचा नारा दिला आहे. याचा अर्थ अमेरिकेच्या वस्तू खरेदी करू नका असा होतो.म्हणजेच मोदी यांनी ट्रम्प यांच्या धोरणाला फटकारले आहे. व्यक्तिगत संबंध महत्त्वाचे नाहीत. मी माझ्या देशातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देतो आहे आणि देणार आहे अशा शब्दात मोदी यांनी अमेरिकेच्या अडवणुकीच्या विरोधात ठामपणे उभा आहे असे सूचित केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांच्या निर्यातीवर भरमसाठ टेरिफ आणि पेनल्टी लावल्यामुळे त्याचा भारतीय व्यापारावर नक्कीच प्रतिकूल परिणाम होणार आहे. पण त्यामुळे डगमगून जायची गरज नाही. यापूर्वीही अटल बिहारी बाजपेयी हे पंतप्रधान असताना त्यांनी पोखरण येथे अणुचाचणी केल्यानंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते.हे इथे लक्षात घेतले पाहिजे.अमेरिकेने भारतासोबत असलेला व्यापार करार मोडीत काढायचे ठरवले असले तरी येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे आणि ठेवणार आहोत.गुरुवारी देशभरातील जवळपास 150 पेक्षा ही अधिक व्यापारी संघटनांनी बैठक घेऊन नरेंद्र यांच्या मागे ठामपणाने राहण्याची शपथ घेतली आहे.
भले आमचा अमेरिकेशी असलेला व्यापार बुडाला तरी चालेल, पण देशहिताशी आम्ही तडजोड करणार नाही. अमेरिकेला आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ. संभाव्य प्रतिकूल परिस्थितीला आम्ही मुळीच घाबरणार नाही. समर्थपणे आम्ही त्याला सामोरे जाऊ असा निर्धार व्यापारी संघटनांनी करून केंद्र शासनाला साथ करण्याचेशपथ घेऊन ठरवले आहे हे वाखाणण्यासारखे आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार युद्ध सुरू झाले असताना देशातील विरोधकांनी, घेतलेली भूमिकासमर्थनीय नाही. विरोधकांनी अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेवर हल्ला चढवणे अपेक्षित होते. पण त्याचा आता आसुरी आनंद घेतला जातो आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे हे सुद्धा अपवाद नाहीत. संकटकाळात देशाच्या नेतृत्वाबरोबर राहण्याऐवजी, हे नेतृत्वच कसे नालायक आहे असे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो देश हिताचा विचार करता योग्य नाही.
हेही वाचा :
लाल किल्ल्यावरचा भव्य सोहळा डोळ्यांनी पाहा, तिकिटे ऑनलाइन बुक करा!
WFI चा मोठा निर्णय: बनावट कागदपत्र प्रकरणी 11 कुस्तीपटूंना निलंबित
धर्म बदल, वैवाहिक वाद आणि हत्या – हुमा कुरेशीच्या भावामागील धक्कादायक सत्य