कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शिरोळ तालुक्यातील तमदलगे गावच्या हद्दीत असलेल्या बसवान खिंड या निर्जन डोंगराळ भागात २७ मे रोजी एका युवकाचा मृतदेह(murder) आढळून आला होता. या खुनाच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली असून, हा खून कोणत्याही परक्याने नाही, तर सख्ख्या भावानेच सुपारी देऊन करवून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील (रा. निमशिरगाव) असं मृतकाचे नाव आहे. त्याच्या सक्ख्या भावानेच सहा लाख रुपये सुपारी देवून खून करवून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

सदर घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सदरचा गुन्हा(murder) उघडकीस आणून आरोपीना तात्काळ अटक करणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील एकुण 3 पथके सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेण्यासाठी नेमण्यात आली. तसेच सदर तपासकामी जयसिंगपूर पोलीस स्टेशनकडील 2 पोलीस पथके अशी एकुण 5 पथके नेमण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा व जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील तपास पथकास चौकशी दरम्यान मयताचा भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याच्यावर संशय आला. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्याच्याकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता त्याने तोंड उघडलं.
खुनामागे कौटुंबिक वाद
अविनाश हा रोज दारू पिऊन घरी येत असे आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करत असे. त्याच्या या वागणुकीला कंटाळून त्याचा सख्खा भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने मित्र मोहन प्रकाश पाटील याच्या मदतीने राकेश उर्फ विनोद वसंत थोरात (रा. दानोळी) याला खून करण्यासाठी सुपारी दिली.
सुपारीचं रचलेलं जाळं
राकेश थोरात याने खून(murder) करण्यासाठी ६ लाख रुपये मागितले. जिनगोंडा पाटील याने आधी ३ लाख रुपये रोख दिले आणि खून झाल्यावर उर्वरित ३ लाख देण्याचे कबूल केले. राकेशने आपल्या सहकाऱ्यांसह किरण आमान्ना थोरात, सागर भिमराव लोहार, अमर रामदास वडर यांना गुन्ह्यात सामील करून घेतले. या टोळीने अविनाशच्या हालचालींवर नजर ठेवायला सुरुवात केली.
डोंगरात नेऊन निर्घृण खून
२६ मे रोजी रात्री आरोपींनी अविनाश पाटील यास फसवून तमदलगे गावच्या हद्दीत असलेल्या बसवान खिंडीत नेले आणि तेथे त्याच्या डोक्यात दगड घालून निघृण खून केला. मृतदेह निर्जन डोंगरात टाकण्यात आला होता.
आरोपींना अटक
जयसिंगपूर पोलीस ठाणे व कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्त तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व कौशल्यपूर्ण चौकशीच्या आधारे जिनगोंडा पाटीलवर संशय घेण्यात आला. चौकशीत त्याने अखेर खुनाची कबुली दिली.
पोलिसांनी उर्वरित आरोपींना दानोळी, भादोले व निमशिरगाव येथून अटक केली.जिनगोंडा ओमगोंडा पाटील (३७) (सख्खा भाऊ), मोहन प्रकाश पाटील (३३) (मध्यस्थ), राकेश उर्फ विनोद वसंत थोरात (२३) (सुपारी घेणारा), किरण आमान्ना थोरात (२७) (सहकारी), सागर भिमराव लोहार (३०) (सहकारी), अमर रामदास वडर (३३) (सहकारी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या सर्व आरोपींना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
शरद पवारांना दोन नोटिसा! आयोगासमोर उद्या हजर राहणार?
घिबली नंतर, बेबी व्हर्जन व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड, बनवण्याची पद्धत जाणून घ्या
नागरिकांनो सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा