“१५ ऑगस्टला मटण पार्टीचा इशारा; आव्हाडांचा शिंदेंना थेट सवाल”

आव्हाड यांनी संताप व्यक्त करताना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चॅलेंज(Challenge) दिलं आहे. नेमकं हे प्रकरण काय जाणून घ्या. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्टनिमित्त पालिका हद्दीत मासविक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशावरुन शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड प्रचंड संतापले असून हा निर्णय म्हणजे एक तमाशा असून आता लोकांनी कधी काय खावं आणि विकावं हे प्रशासन ठरवणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. कायद्याने अशी काही बंदी घातली आहे का असा सवाल विचारतानाच याच्या बापाचे राज्य आहे का? अशा शब्दांमध्ये आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे.

मांसविक्री बंदीच्या निर्णयावरुन आव्हाडांनी, ‘हा काय तमाशा आहे?’ असा सवाल केलाय.”बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे. मनुष्य प्राण्याच्या दातची रचना बघून कोणाला ही विचारा ही रचना मांसाहारी आहे की नाही. हजारो सालाचा इतिहास आहे. माकडापासून आपली उत्पत्ती झाली. याचदरम्यान दाताची रचना झाली यावरून कळत तुम्ही मांसाहारी आहात,” असं आव्हाड म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “ज्या देशाला स्वतंत्र मिळाले त्या दिवशी आमचं स्वतंत्र हिरावून घेत आहात… हा काय तमाशा चालवलाय?” असा सवाल आव्हाडांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना केला. “कल्याण-डोंबिवली बहुजन समाजाला विरोध करण्यात काय अर्थ आहे? माझं तर विचार आहे, त्याठिकाणी मटणाची पार्टी ठेवणार.

महाराष्ट्र शासनाने इतकेच करावे की तारीख जाहीर करावी,” असं आव्हाड म्हणालेत.”ओबीसी विरुद्ध मराठा, हिंदू विरुद्ध मुसलमान वाद झाला, मराठी विरुद्ध हिंदी झालं आता शाकाहारी विरुद्ध मांसाहारी असं सुरू करा,” असा टोला आव्हाड यांनी सरकार आणि प्रशासनाला लगावला. “आदेश काढणारी ही गायकवाड बाई कोण आहे तिला कोणी अधिकार दिलेला आहे? शासन नावाचं काय आहे की नाही? लोकप्रतिनिधी नाही तिकडे आयुक्तांनी बाहेर येऊन त्यांची भूमिका काय हे सांगावं,” असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. “शासनाला खाणं निवडण्याचा अधिकार दिलाय का? कल्याण, मुंबईमध्ये श्रीखंडपुरी खावी असे शासनाचे आदेश आहेत का?” असा सवाल आव्हाडांनी विचारलाय. “मी समविचारी पक्षांच्या नेत्यांशी बोलतो.

मी स्वतः कल्याण डोंबिवलीमधील कोणाच्या तरी घरी जाऊन 15 ऑगस्टच्या दिवशी मटन, मच्छी जेवणार आहे. तुमच्यात हिंम्मत असेल तर मला अटक करून दाखवा,” असं थेट आव्हान आव्हाडांनी दिलं आहे.जवळचे मित्र आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात मांसविक्री बंदीची पहिली प्रयोगशाळा झाली, असंही आव्हाड म्हणाले. “जैन धर्माच्या नावाने मच्छी मटनाची दुकानं बंद करण्यात आली. सरनाईक यांची पत्नी मांसाहारी पदार्थ खूप सुंदर बनवते. मी अनेकवेळा तिच्या हातचं जेवलोय. त्यांनी त्यांना विचारावं की तुम्ही बनवणं बंद करणार आहात का?” असा सवाल आव्हाडांनी केला. तसेच, “नेत्यांची पोर बाहेर जाऊन कुठल्या प्राण्याचे मटन खातात हे मला माहिती आहे,” असं सूचक विधानही आव्हाड यांनी केलं.

“एकनाथ शिंदे यांनी भूमिका घ्यावी की माझा ऑनलाईन विरोध आहे. यापुढे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, दसरा-दिवाळीमध्ये कल्याण-डोंबिवलीला मटन, मच्छी विकली जाणार नाही, हे जाहीर करावं असं माझं त्यांना आवाहन आहे(Challenge),” असंही राऊत म्हणाले.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने आणि मांसविक्रीची दुकाने 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत 24 तास बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये बकरी, मेंढी, कोंबडी आणि मोठ्या प्राण्यांचे मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे.

त्यांनी हा निर्णय “तमाशा” असल्याचे म्हटले असून, लोकांचे खाण्याचे स्वातंत्र हिरावून घेतल्याचा आरोप केला आहे. त्यांनी 15 ऑगस्टला कल्याण-डोंबिवलीत मटणाची पार्टी आयोजित करण्याची घोषणा केली आहे.आव्हाड यांचे म्हणणे आहे की, बहुजन समाजाचा डीएनए मांसाहारी आहे आणि मानवी दातांची रचना मांसाहारी असल्याचे दर्शवते. स्वातंत्र्यदिनासारख्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवशी खाण्याचे स्वातंत्र हिरावणे चुकीचे आहे. त्यांनी या निर्णयाला सामाजिक भेदभाव वाढवणारा आणि बहुजन समाजाविरोधी असल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा :

इंजिनियरिंग सोडून AI-आधारित शेतीतून लाखोंची कमाई! शेती ठरली अधिक फायदेशीर
12 पास महिलांसाठी नोकरीची मोठी संधी! 9 हजार 900 पदासांठी भरती प्रक्रिया सुरु, जाणून घ्या सविस्तर माहि
आनंदी क्षणांचा सोबती सिंबा