मराठी अभिनेता सुयश टिळकच्या गाडीला भीषण अपघात (Accident)झाला असून याबाबत अभिनेत्यानं इन्स्टा पोस्ट करुन माहिती दिली आहे.का रे दुरावा’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता सुयश टिळकच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुयश टिळकनं स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या पोस्टमधून सुयश टिळकनं अपघाताच्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तसेच, अपघात झाला असला तरी तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही सुयशनं म्हटलं आहे.

पण, या अपघातानंतर मात्र सुयशला मुंबई गाठायला खूप स्ट्रगल करावा लागवा, त्याला 6-7 तास ट्रकमधून प्रवास करुन मुंबई गाठावी लागली, असंही सुयशनं सांगितलं आहे. इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये सुयश टिळक म्हणाला की, “वाहन न चालवता केलेला सर्वात लांबचा प्रवास… थोडासा अपघात (Accident)झाला, पण सुदैवाने कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र, झालेल्या नुकसानामुळे माझी गाडी अक्षरशः बंद पडली. मला किंवा इतर कुणालाही दुखापत झाली नाही, याबद्दल मी कृतज्ञ आहे. पण ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे मला कोणतीही मदत मिळत नव्हती”.

“घरी जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गाडी टो करून थेट मुंबईत आणणे. साधारण तासभर प्रतीक्षा केल्यानंतर मदत पोहोचली. टो ड्रायव्हर म्हणाला, “तुम्ही आत बसा, गाडीला कधी मदतीची गरज भासली तर. मदत काय? गाडी तर श्वासही घेऊ शकत नव्हती! मग मी बसलो होतो एका शांत, एसी नसलेल्या माझ्या गाडीत. 6-7 तास महामार्गावरून ओढत नेलं जाणार होतं. रस्त्यावरचे लोक आत डोकावत, काही जण माझ्या अवस्थेवर हसत होते, तर काही कदाचित काय झालं असेल याचा अंदाज बांधत होते”, असं सुयश टिळक म्हणाला.
“मी रागावू शकलो असतो, चिडलो असतो, वैतागलो असतो. पण कधी कधी आयुष्य तुमच्यासमोर जी परिस्थिती आणतं, ती तशीच स्वीकारावी लागते. मी पुस्तक वाचलं, संगीत ऐकलं, थोडा झोपलो. या असामान्य हलत्या सीटवरून जग सरकताना पाहिलं. दिवसभराचा अनुभव मोबाईलमध्ये टिपला आणि तो एडिट करून मिनी व्लॉग बनवला. तुम्ही या व्लॉगचा आनंद घ्या”. सुयशनं पोस्टच्या शेवटी लिहलं, “कधी कधी, आयुष्य तुम्हाला खेचत नेतं, तुम्हाला आवडो वा न आवडो. तुम्ही तो प्रवास रागाने घालवू शकता… किंवा खिडकी उघडून..खोल श्वास घेऊन.. तो प्रवास एन्जॉय करू शकता”, असं सुयश टिळक म्हणाला.
हेही वाचा :
“१५ ऑगस्टला मटण पार्टीचा इशारा; आव्हाडांचा शिंदेंना थेट सवाल”
इंजिनियरिंग सोडून AI-आधारित शेतीतून लाखोंची कमाई! शेती ठरली अधिक फायदेशीर
12 पास महिलांसाठी नोकरीची मोठी संधी! 9 हजार 900 पदासांठी भरती प्रक्रिया सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती