नेहमीच भेंडीची तिखट भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही (delicious)सोप्या पद्धतीमध्ये भेंडी रायता बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया भेंडी रायता बनवण्याची सोपी रेसिपी.

सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं खूप जास्त घाई असते. घाईगडबडीच्या(delicious) वेळी जेवणाच्या डब्यात भाजी काय बनवावी सुचत नाही. नेहमीच डब्यात कडधान्य किंवा ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भेंडीचा रायता बनवू शकता. लहान मुलांसह अगदी मोठ्यांना भेंडीची भाजी खायला खूप असत आवडते. भेंडीच्या भाजीमध्ये काही लोक शेंगदाण्याचा कूट टाकतात तर काही लोक ओल किसलेलं खोबर टाकतात. अनेक वेगवेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवली जाते. भेंडीच्या भाजीचा रायता चवीला अतिशय सुंदर लागतो. आंबट गोड चवीच्या रायत्यासोबत जेवणात चार घास जास्त जातील. चला तर जाणून घेऊया भेंडीचा रायता बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
भेंडी
दही
मीठ
हिरवी मिरची
जिऱ्याची पावडर
लाल तिखट
हळद
तेल
कोथिंबीर
बेसन
साखर
कृती:
भेंडीचा रायता बनवण्यासाठी सर्वप्रथम, भेंडी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्या. त्यानंतर भेंडीचे उभे बारीक तुकडे करून घ्या.
कढईमध्ये तेल गरम करून त्यात भेंडी भाजण्यासाठी टाका. भेंडी भाजताना त्यात चवीनुसार मीठ टाका. यामुळे भेंडी बेचव लागणार नाहीत.
भेंडी भाजल्यानंतर त्यात बेसन टाकून व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यात लाल तिखट, हळद, साखर, जिऱ्याची पावडर आणि हिरव्या मिरच्या घालून व्यवस्थित मिक्स करा.
मिक्स करून झाल्यानंतर त्यात भाजून घेतलेली भेंडी घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला भेंडीचा रायता.
हेही वाचा :
स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते
अजब शोध! पृथ्वीखाली दडलेल्या जीवसृष्टीचे सापडले पुरावे, चिनी- कॅनेडियन शास्त्रज्ञांचा अनोखा दावा
राज्यात पावसाचे पुनरागमन होणार; मुंबईतही पावसाचा जोर वाढणार, पुण्यासह सांगली, कोल्हापूरमध्ये तर…