चिमूर बसस्थानक परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (Woman) मृत महिलेचे नाव वनिता सुरेश शेंद्रे (वय ६०, रा. कोजबी, ता. नागभीड) असे आहे.वनिता शेंद्रे या माणिकनगर, पावसी आंबा येथे झोपडी करून राहत होत्या. ४ जून रोजी सकाळी त्या खडसंगी येथे भीक मागण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी त्या चिमूर बसस्थानकावर परतल्या.

बसस्थानकावरून आपल्या झोपडीकडे जात असताना अमरावतीकडून चिमूरकडे येणारी एमएच-१४ एमएच-३५०१ क्रमांकाची बस भरधाव वेगात आली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने वनिता शेंद्रे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात बसचे समोरील चाक पोटावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश दरेकर, पोलिस शिपाई भास्कर आत्राम, फाल्गुन परचाके, प्रफुल वर्टी आणि गणेश वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Woman) मृतदेह वाहनाखालून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.त्यानंतर पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला. मृतकाच्या पश्चात मुलगा संदीप शेंद्रे, मुलगी काजल शेंद्रे असा परिवार आहे. आईच्या अकाली निधनामुळे दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यात ७२ हजार जणांचे मोफत रेशन बंद
भारत-व्हेनेझुएला ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन भागीदार
पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज काय आहे अपडेट?