बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतून समोर येत आहे. (Horrible)एका ३५ वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणाची माहिती पीडित मुलींच्या आईला समजताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईच्या कांदिवली परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींचे वय ८ आणि १० वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. (Horrible)मागील सहा महिन्यांपासून नराधम बाप त्यांच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. नंतर आरोपीने आपल्या मुलींना ही बाब कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी नराधम बापाने केलेल्या दुष्कृत्याची माहिती कुणालाही सांगितली नाही.
मात्र, याची माहिती आईला समजल्यानंतर तिच्या पायाची वाळू सरकली. तिने थेट समता नगर पोलीस ठाणे गाठले. तसेच नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली. (Horrible)गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच संबंधित आरोपी घटनेच्या ठिकाणाहून फरार झाला आहे. समता नगर पोलीस आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकत आहेत.पोलिसांकडून या प्रकरणाचा गंभीरतेने तपास सुरू असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पीडित मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक
कोल्हापूरच्या हद्दवाढी शिवाय को.म.न.पा. निवडणूक होणार
रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक, राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द