भाजप नेत्याचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून भाजप प्रदेश कार्यकारिणीचे (obscene)सदस्य बब्बन सिंह रघुवंशी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका कार्यक्रमादरम्यान महिला नर्तकीसोबत कथित आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये नर्तकी त्यांच्या जवळ येते, त्यांच्या पायाजवळ बसते आणि ते तिच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचे दिसत आहे. यावरून त्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. व्हिडिओमध्ये कार्यक्रमादरम्यान उपस्थित लोक टाळ्या वाजवताना दिसत आहेत, तर काही लोक हूटिंगही करत आहेत. पार्श्वभूमीत भोजपुरी गाणे वाजत आहे आणि व्हिडिओच्या शेवटी काही लोक महिला नर्तकीवर पैसे उधळताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना बब्बन सिंह यांनी याला “राजकीय षड्यंत्र” म्हटले आहे. हा व्हिडिओ खोटा असून त्यांना बदनाम करण्यासाठी रचलेले षड्यंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (obscene)बब्बन सिंह यांनी भाजप आमदार केतकी सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर थेट आरोप केला असून त्यांनी हे षड्यंत्र रचल्याचे म्हटले आहे.बब्बन सिंह म्हणाले, “मी बिहारमध्ये एका वरातीत सहभागी झालो होतो, जिथे आमदार केतकी सिंह यांचे पती आणि त्यांचे लोकही उपस्थित होते. माझे वय 70 वर्षे आहे, मला आयुष्मान कार्ड मिळाले आहे. मी असे कोणतेही कृत्य करू शकत नाही.” केतकी सिंह यांच्याशी त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय मतभेद असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याने त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. (obscene) त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.बब्बन सिंह हे बलिया जिल्ह्यातील मुरली छपरा ब्लॉकच्या रामनगर गावचे रहिवासी आहेत. ते भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असून, शेतकरी सहकारी साखर मिल्स समिती लिमिटेड, रसडा येथे उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. बब्बन सिंह यांनी 1993 मध्ये बांसडीह विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूकही लढवली आहे

हेही वाचा :

ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक

कोल्हापूरच्या हद्दवाढी शिवाय को.म.न.पा. निवडणूक होणार

रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक, राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द

17 मे पासून पुन्हा रंगणार IPL चा थरार; पाहा संपूर्ण शेड्यूल; या दिवशी होणार फायनल

TVS लवकरच स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार, किंमत वाचून थक्क व्हाल

आयपीएल दरम्यान DC ला मोठा झटका! ‘या’ वेगवान गोलंदाजाने भारतात परतण्यासाठी दिला स्पष्ट नकार..