एका नवऱ्यासाठी दोन बायकांची भांडणं! झिंज्या धरल्या, ओढत नेलं; व्हिडिओ व्हायरल

”प्रेम आंधळं असतं” असं म्हटलं जातं. परंतु, हे प्रेम जेव्हा गैरसमज, फसवणूक आणि हट्ट यामध्ये फसले जाते. तेव्हा त्याचं रूप हाणामारीतही बदलते. नुकताच असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात घडला आहे. जिथे एका नवऱ्यावरून दोन महिलांची रस्त्यावरच जोरदार हाणामारी(fight) झालेली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिलांमध्ये एक पुरुष आपलाच नवराआहे असा दावा करत भांडण(fight) सुरु होते. भररस्त्यात सुरु असलेला वाद काही क्षणात इतका उफाळतो की, त्या एकमेंकीच्या झिंज्या ओढतात. धक्कादायक म्हणजे रागात कपडे फाडतात आणि जमिनीवर लोळवत एकमेंकीना मारतात. रस्त्यातील नागरिकांनी दोघींना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. पण त्या काहीही ऐकण्यास तयार नव्हत्या. गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

घडलेला हा प्रकार उत्तर प्रदेशमधील मेरठचा आहे. गेल्या काही वर्षात मेरठमध्ये अशा काही घटना घडल्या ज्याने संपूर्ण देश हादरुन गेला. मात्र, सध्या या घटनेने सोशल मीडियावरील नेटकरी हैराण झालेले आहेत. ही घटना घडल्यानंतर सर्व व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेला आहे. त्यात तो @lalluram_news या एक्सवर अपलोड केला आहे.

ही घटना पाहून या व्हिडिओला लाखोंचे लाईक्स, व्ह्यूज आणि शेकडो प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,”भररस्त्यात तमाशा करायची गरज काय” तर दुसऱ्या यूजरने गंमतीमध्ये म्हटलं की,”एकमेंकीना मारण्या ऐवजी नवऱ्याला मारले पाहिजे होते” तर प्रकारे काहींनी संतापजनक तर काहींनी गंमतशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: महिलांच्या हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

हेही वाचा :

फक्त तहान लागणे एवढंच नाही, Dehydration ची आणखी काही लक्षणे

‘हे पाहून मला मुस्लीम असल्याची लाज वाटते…’; पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड गायक संतापला

नवरीनं खाल्ला रसगुल्ला, हात धुण्याच्या बहाणा करून गेली प्रियकरासोबत पळून