पुणे हादरले! १२ वर्षांच्या मुलीवर मित्राकडून बलात्कार, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी, कॅफेत नेऊन

पुण्यातील मावळमध्ये १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. मित्राने अश्लील फोटो व्हायरल करत या मुलीला कॅफेत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना मावळच्या तळेगावमध्ये घडली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याचा मित्र तसंच ज्या कॅफेत ही घटना घडली त्या कॅफे मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. या तिन्ही आरोपांना पोलिसांनी अटक केली. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. (girl) मिळालेल्या माहितीनुसार, मावळच्या तळेगाव दाभाडे येथील एका कॅफेमध्ये १२ वर्षीय मुलीवर तिच्या मित्राने बलात्कार केला. आरोपीने पीडित मुलीचे अश्लील फोटो व्हायरल केले होते. त्याने तिला भेटायला बोलावून तिला कॅफेत नेत तिच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणजे पीडितेचा मित्र आणि त्याचा मित्र ज्याने पीडितेचे अश्लिल फोटो व्हायरल केले या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. तर पोलिसांनी या प्रकरणी कॅफे मालकाविरोधात देखील कारवाई केली. या कॅफेमध्ये असे प्रकार सुरू असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. (girl) त्यामुळे पोलिसांनी कॅफे मालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या घटनेमुळे तळेगाव दाभाडे परिसरात एकच खळबळ उडाली.

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले की, ‘पीडित मुलगी आणि तिची आई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. (girl) तिच्या मित्रांनी तिचे न्यूड फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तिने तक्रार केली. त्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास करताना आणि पीडितेची चौकशी करताना असे निदर्शनास आले की, तळेगावमधील एका कॅफेमध्ये एका मुलाने तिला सोबत नेऊन बलात्कार केला. यासंदर्भात तपास करताना असे निदर्शनास आले की कॅफेमध्ये असा प्रकार चालतो. त्यामुळे कॅफे मालकाला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. तर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या मुलाला आणि त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली.’

हेही वाचा :

कोल्हापूर जिल्ह्यात ७२ हजार जणांचे मोफत रेशन बंद

भारत-व्हेनेझुएला ऊर्जा क्षेत्रात दीर्घकालीन भागीदार

पेरणी कधी करायची? शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज काय आहे अपडेट?