कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
श्री. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला बुधवारी एक तप म्हणजे बारा वर्षे पूर्ण झाली. किमान समान कार्यक्रमाची लक्ष्मण रेषा आखून, छोट्या मोठ्या 39 पक्षांना बरोबर घेऊन, राजकीय स्थैर्य केंद्रस्थानी ठेवून, विकासाचे प्रवाह, प्रवाहित करून सलग बारा वर्षे आणि त्यानंतर ही पुढे पंतप्रधान म्हणून कार्यरत राहणे हे साधे आणि सोपे नाही. (Mr. Narendra Modi) म्हणूनच नरेंद्र मोदी हे नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू, श्रीमती इंदिरा गांधी यांच्याशी त्यांची तुलना करता येत नाही किंवा करूच नये. प्रत्येकाचा काळ वेगळा होता, प्रश्न वेगळे होते, राजकारणाचा पोत वेगळा होता. आणि अर्थात महत्त्वाचे म्हणजे ज्या त्या काळाच्या चष्म्यातून त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिले पाहिजे. मग पंतप्रधान म्हणून श्रेष्ठ कोण याची चर्चा गैर आणि अस्थानी ठरते.

पंडित जवाहरलाल नेहरू हे सलग ४३९८ दिवस पंतप्रधान पदावर होते. त्यांचा हा विक्रम बुधवार दिनांक 10 जून रोजी नरेंद्र मोदी यांनी मोडीत काढला आहे. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून आजचा चार हजार 399 वा दिवस आहे. यापुढेही त्यांचा पंतप्रधान म्हणून प्रवास सुरूच राहणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर चे राजकीय चित्र काय असणार आहे हे आज कुणी सांगू शकत नाही. पण आज तपपूर्तीच्या
निमित्ताने काही विचारवंत, राजकीय विश्लेषक, राजकीय नेते पंडित नेहरू आणि नरेंद्र मोदी यांच्यातील तौलनिक विश्लेषण करताना दिसत आहेत.
पंडित जवाहरलाल नेहरू हे या देशाचे पहिले पंतप्रधान झाले. तेव्हा गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता. तेव्हा या देशाची लोकसंख्या 35 कोटी होती.या देशात साधी टाचणी तयार होत नव्हती. पण त्यांच्याच काळापासून सर्व काही बदलत गेले. एकाच वेळी विकासाचे अनेक प्रकल्प त्यांच्याच काळात सुरू झाले. इस्रो ही अवकाश संशोधन संस्था त्यांच्याच काळात स्थापन झाली. अर्थात तेव्हा राजकीय स्थैर्यता होती. फारसे विरोधक नव्हते. जे होते त्यांचा आवाज क्षीण होता. प्रचंड बहुमत असले की सत्ता राबवणे सहज शक्य असते. त्यांनी त्यांच्या बारा वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत देशाचे हित जोपासले, (Mr. Narendra Modi) पण त्यांचे काही राजकीय निर्णय वादग्रस्त ठरले. एकच उदाहरण द्यायचे झाले तर ते पाक व्याप्त काश्मीरच्या संदर्भातील देता येईल. त्याबद्दलची चर्चा आज मोठ्या प्रमाणावर अधून मधून होत असते, पण त्यांच्या तेव्हाच्या त्या निर्णयाकडे त्या काळातील चष्म्यातूनच पाहिले पाहिजे.
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात आजच्यासारखे प्रश्न किंवा समस्या नव्हत्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर त्यांच्याच सुकन्या श्रीमती इंदिराजी गांधी या सर्वाधिक काळ म्हणजे 4 हजार 77 दिवस पंतप्रधान पदावर होत्या. त्यांच्या काळात विरोधकांची संख्या वाढत होती. प्रादेशिक पक्षांचा उदय होत होता. बांगलादेश मुक्ती नंतर त्यांची तुलना तेव्हाच्या इंग्लंडच्या पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांच्याप्रमाणे आयर्न लेडीज अर्थात पोलादी पंतप्रधान अशी तुलना केली जात होती. पण त्यांनी देशावर आणीबाणी लागली आणि देशाचे राजकीय संदर्भ बदलले, समीकरणे बदलली. त्यांच्या विरोधात सर्व विरोधी राजकीय पक्षांचे ध्रुवीकरण झाले. त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच ठाऊक आहे.
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात प्रादेशिक पक्ष मजबूत होऊन पुढे आले. आणि मग त्यांच्याशिवाय कोणत्याही प्रमुख पक्षाला सत्तेचा सोपान चढणे कठीण होते. एकापेक्षा अधिक राजकीय पक्षांना सोबत घेऊन सत्ता राबवणे हे साधे काम नव्हे.अटल बिहारी बाजपेयी यांना त्यचा मोठा अनुभव ते पंतप्रधान असताना आलेला होता.लाल कृष्ण अडवाणी यांच्या काळात हिंदू मतांचे ध्रुवीकरण होण्यास प्रारंभ झाला. बाबरी मशीद हे त्यासाठी कारण ठरले. इसवी सन 2014 मध्ये देशाचे राजकारण नरेंद्र मोदी यांनी ढवळून काढले. मतांच्या ध्रुवीकरणातून भाजप हा स्वबळावर सत्तेत येऊ शकतो हे सिद्ध झाले. पण तरीही नरेंद्र मोदी यांनी किमान समान कार्यक्रम या तत्त्वावर देशातील छोट्या मोठ्या 39 राजकीय पक्षांची मोट बांधून एनडीए संघटन अस्तित्वात आणले.
इसवी सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान झाले. (Mr. Narendra Modi) आता त्यांच्या पंतप्रधान पदाची तिसरी टर्म सुरू आहे. ही तिसरी टर्म त्यांना विक्रमाकडे घेऊन गेली. पहिल्या दोन टर्म पेक्षा तिसरी टर्म ही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने कसोटीची ठरलेली आहे. 2019 नंतरचे दशक हे भारतासाठी आपत्ती जनक ठरलेले आहे. कोविड ची तीन वर्षे, त्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव, आणि आत्ताची पश्चिम आशियातील युद्ध स्थिती…
हेही वाचा :
तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी