मृत्यू जेव्हा देशासाठी येतो तेव्हा तो ‘गौरव’ बनतो, पण जेव्हा तो एका तीन वर्षांच्या चिमुरडीचे पितृछत्र हिरावून नेतो, तेव्हा तो ‘क्रूरतेचा कळस’ ठरतो. देशाच्या सीमेवर प्राणांची आहुती देऊन शहीद झालेले गोंडोली गावचे सुपुत्र, वीर जवान विक्रम चव्हाण यांचे पार्थिव शुक्रवारी जेव्हा त्यांच्या मातृभूमीत दाखल झाले. तेव्हा केवळ एक गाव नाही, तर संपूर्ण आसमंत रडला.

हवेत उमटणारे ‘शहीद विक्रम चव्हाण अमर रहे…’ चे नारे एका बाजूला अभिमानाची जाणीव करून देत होते, तर दुसऱ्या बाजूला काळजाचे तुकडे करणाऱ्या आक्रोशाने संपूर्ण वातावरण गोठवून टाकले होते. पण या संपूर्ण कारुण्यात, एका दृश्याने तिथे उपस्थित असलेल्या हजारो जनसमुदायाचे काळीज पार पिळून काढले. ते दृश्य होते शहीद विक्रम यांच्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीचे— वीराचे! घरच्या अंगणात तिरंग्यात वेढलेलं वडिलांचं पार्थिव ठेवलं होतं. बाजूला तिच्या आईचा हुंदका काळीज चिरत होता, आजोबांचा टाहो दगडालाही पाझर फोडत होता. नातलग, ग्रामस्थ, लष्कराचे जवान… प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. पण या संपूर्ण आक्रोशात, तीन वर्षांची चिमुरडी वीरा मात्र अत्यंत शांत होती. (father’s) तिला कदाचित अजून हेही उमजले नव्हते की, ज्या खांद्यावर बसून तिने अख्खं गाव पाहिलं, ते खांदे आता कधीच उठणार नाहीत. ज्या हातांनी तिला मायेने कुरवाळलं, ते हात आता कायमचे शांत झाले आहेत.
ती तिच्या वडिलांच्या पार्थिवाकडे अत्यंत निरखून, एकटक पाहत होती. तिच्या त्या गोड, निष्पाप डोळ्यांमध्ये ना भीती होती, ना अश्रू… तिथे होता फक्त एक अबोल प्रश्न— “बाबा, तुम्ही असे झोपले का आहात? उठून मला कडेवर का घेत नाही?” तिच्या त्या अबोल नजरेतली आर्तता एवढी तीव्र होती की, क्षणभर तिथे उपस्थित असलेला काळही गोठला असावा.घरच्या अंगणात तिरंग्यात वेढलेलं वडिलांचं पार्थिव ठेवलं होतं. बाजूला तिच्या आईचा हुंदका काळीज चिरत होता, आजोबांचा टाहो दगडालाही पाझर फोडत होता. नातलग, ग्रामस्थ, लष्कराचे जवान… प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी डबडबलेले होते. पण या संपूर्ण आक्रोशात, तीन वर्षांची चिमुरडी वीरा मात्र अत्यंत शांत होती. तिला कदाचित अजून हेही उमजले नव्हते की, ज्या खांद्यावर बसून तिने अख्खं गाव पाहिलं, ते खांदे आता कधीच उठणार नाहीत. (father’s) ज्या हातांनी तिला मायेने कुरवाळलं, ते हात आता कायमचे शांत झाले आहेत.
ती तिच्या वडिलांच्या पार्थिवाकडे अत्यंत निरखून, एकटक पाहत होती. तिच्या त्या गोड, निष्पाप डोळ्यांमध्ये ना भीती होती, ना अश्रू… तिथे होता फक्त एक अबोल प्रश्न— “बाबा, तुम्ही असे झोपले का आहात? उठून मला कडेवर का घेत नाही?” तिच्या त्या अबोल नजरेतली आर्तता एवढी तीव्र होती की, क्षणभर तिथे उपस्थित असलेला काळही गोठला असावा.तिचे ते निष्पाप रूप आणि पितृछत्र हरपल्याची ती क्रूर जाणीव पाहून तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाचा धीर सुटला. अनेक कठीण प्रसंगांना तोंड देणारे लष्कराचे खंबीर जवानही चिमुरड्या वीराकडे पाहून आपले अश्रू रोखू शकले नाहीत. ज्या बापाने देशासाठी प्राणांची आहुती दिली, त्या बापाचे हे शेवटचे रूप पाहणारी वीरा भविष्यात जेव्हा मोठी होईल, तेव्हा तिला आपल्या वडिलांचा सार्थ अभिमान नक्कीच वाटेल; पण आज तिचे ते ‘पितृछत्र हरपलेले’ रूप पाहून काळाच्या छातीतही धडकी भरली असेल, यात शंका नाही.ज्या वयात हाताला धरून चालायचे, (father’s) त्याच वयात बापाच्या पार्थिवाकडे ‘निरखून’ पाहण्याची दुर्दैवी वेळ या वीरावर आली. संपूर्ण गोंडोली गावाने, साश्रू नयनांनी आणि जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या वीर सुपुत्राला अंतिम निरोप दिला, पण वीराची ती निष्पाप नजर प्रत्येक डोळ्यात जन्माचे अश्रू ठेवून गेली.
हेही वाचा :
आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू