केरळमध्ये एका महिलेने आपल्याच मैत्रिणीच्या १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी केरळ पोलिसांनी शुक्रवारी संशयीत आरोपी महिलेला अटक केली आहे. स्नेहा मर्लिन (वय २५, रा. कन्नूर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विकृत महिलेवर नोंदवला गेलेला हा चौथा ‘पोक्सो’ गुन्हा आहे.

समुपदेशनादरम्यान धक्कादायक सत्य उघड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काही महिन्यांपूर्वी कासारगोड येथील पीडित मुलीच्या घरी घडली होती. या अत्याचाराने भयभीत झालेल्या पीडितेने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नव्हते. मात्र, नुकत्याच झालेल्या एका समुपदेशन सत्रादरम्यान पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला हा भयानक प्रकार समुपदेशकाला सांगितला. (shocking) यानंतर मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत स्नेहा मर्लिनविरुद्ध तक्रार दाखल केली.संशयीत आरोपी स्नेहा ही पीडित मुलीच्या आईची मैत्रीण असल्याने तिचे त्यांच्या घरी सतत येणे-जाणे होते. याच ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत स्नेहाने घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
आधीच तीन गुन्हे दाखल; अल्पवयीन मुलांना बनवले होते शिकार पोलीस तपासात आरोपी स्नेहा मर्लिन हिची अत्यंत धक्कादायक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. तिच्याविरुद्ध नोंदवला गेलेला हा पहिला गुन्हा नाही. मार्च २०२५ मध्ये तळीपरंबा पोलीस ठाण्यात तिच्यावर एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा आधीच दाखल आहे. तसेच इतर दोन गुन्ह्यांमध्ये तिने चक्क अल्पवयीन मुलांना आपले शिकार बनवले होते. (shocking) यामध्ये तळीपरंबा प्रकरणातील पीडित मुलीच्या सख्ख्या भावाचाही समावेश आहे.
पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल तळीपरंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांसाठी स्नेहावर ‘भारतीय न्याय संहिते’च्या कलम ७५ (लैंगिक छळ), कलम ३३२ (घरात बेकायदेशीर प्रवेश) तसेच ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास केरळ पोलीस करत आहेत. स्नेहा मर्लिनविरुद्ध इतरही काही गुन्हेगारी खटले प्रलंबित असून, ती इतर कुठल्या रॅकेट किंवा गुन्ह्यांमध्ये सामील आहे का, (shocking) याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तिच्या पार्श्वभूमीची कसून चौकशी केली जात आहे.
हेही वाचा :
आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू