कोल्हापूरात प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणावर हल्ला; नग्न करून लोखंडी रॉडने मारहाण

कोल्हापूर : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशाचं आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून मुलीच्या नातेवाईकांनी तरुणास नग्न करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण(attacked) केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

सौरभ भरमा कांबळे (वय २४, रा. निढोरी, ता. कागल) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन कांबळे याच्याविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

कुरणी (ता. कागल) येथील एका अल्पवयीन मुलीशी निढोरी येथील सौरभ भरमा कांबळे (वय २४) याचे प्रेमसंबंध असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजले. तेव्हा नातेवाईक व समर्थकांनी गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास सौरभला कारमध्ये जबरदस्तीने बसविले. त्याला कुरणी कालव्याजवळील एका शेडमध्ये नेऊन त्याला नग्न करून बेदम मारहाण(attacked) केली.

मारहाणीत सौरभ कांबळे गंभीर जखमी झाला असून, त्याला कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी प्रशांत नामदेव करडे (रा. मुरगूड), शिवप्रसाद शहाजी पाटील व शुभम जीवन पाटील (रा. कुरणी) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत जखमी सौरभचा भाऊ विजय कांबळे याने मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली.

तर कुरणी येथील संबधित अल्पवयीन मुलीने मुरगूड पोलिसांत फिर्याद दिली आहे. सौरभ कांबळे याने आपल्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले असून, याविषयी वाच्यता न करण्यासंबंधी धमकावल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सौरभ कांबळे याच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

इचलकरंजीत ज्यादा परताव्याच्या आमिषाने डॉक्टरला तब्बल 93 लाखांचा गंडा…

राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट