पीएफ खातेधारकांसाठी सर्वात मोठी आनंदवार्ता! EPFO ने घेतला ऐतिहासिक निर्णय

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने महत्त्वाचा दिलासा दिला आहे. पीएफ काढण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करत काही विशेष परिस्थितींमध्ये संपूर्ण पीएफ रक्कम मिळवण्यासाठी असलेली कारण स्पष्ट करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. या बदलामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना निधी मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.

पीएफ दाव्यांमधील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न यापूर्वी एखादा कर्मचारी दीर्घकाळ बेरोजगार असेल, कंपनी बंद पडली असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडला असेल, तर त्याला पीएफमधील संपूर्ण रक्कम काढण्यासाठी ठोस कारण नमूद करावे लागत होते. त्यासोबत संबंधित कागदपत्रे सादर करणेही बंधनकारक होते. (EPFO) अनेक वेळा अर्जदाराने दिलेले कारण आणि ईपीएफओच्या नियमांमध्ये तफावत आढळल्याने दावे फेटाळले जात होते.यामुळे गरजेच्या वेळी कर्मचारी स्वतःच्या बचतीच्या पैशांपासूनही वंचित राहत होते. ही समस्या लक्षात घेऊन ईपीएफओने नियमांमध्ये बदल केला आहे. नव्या व्यवस्थेनुसार काही विशिष्ट प्रकरणांमध्ये अर्जदाराने संपूर्ण पीएफ काढण्यासाठी केलेला दावा पात्रतेच्या निकषात बसत असल्यास अतिरिक्त स्पष्टीकरण किंवा स्वतंत्र कारण देण्याची गरज भासणार नाही. अशा दाव्यांवर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल.नवीन नियम सर्वांसाठी लागू नसून काही विशेष परिस्थितींमध्येच संपूर्ण पीएफ रक्कम काढण्याची परवानगी दिली जाईल. एखादी कंपनी 15 दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असेल किंवा तिथे टाळेबंदी लागू झाली असेल आणि कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसेल, अशा वेळी हा लाभ मिळू शकतो. तसेच कंपनी सलग सहा महिने कार्यरत नसल्यासही कर्मचारी संपूर्ण पीएफसाठी अर्ज करू शकतो.

याशिवाय कर्मचारी कामगार कपातीमुळे किंवा सेवेतून कमी केल्यामुळे नोकरी गमावून बसला असेल आणि त्याने या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली असेल, तर त्यालाही पूर्ण पीएफ रक्कम काढण्याची मुभा असेल. स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या गंभीर वैद्यकीय उपचारांसाठीही संपूर्ण रक्कम मिळू शकते. मात्र अशा प्रकरणांमध्ये कंपनीचे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे.सामान्य परिस्थितीत मात्र कोणालाही हवे तेव्हा पूर्ण पीएफ काढता येणार नाही. नियमांनुसार गरज भासल्यास खातेदाराला त्याच्या जमा निधीपैकी 75 टक्के रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. (EPFO) परंतु संपूर्ण पीएफ मिळवण्यासाठी विशेष परिस्थिती असणे आणि ईपीएफओच्या अटींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. त्यामुळे नव्या बदलामुळे पात्र कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी संपूर्ण निधी काढण्यासाठी निर्धारित नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

हेही वाचा :

आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

NEET 2026 विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा!

सोने-चांदी महागलं! वाचा आजचे ताजे दर