इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी 14 जून रोजी क्रिकेटप्रेमींना बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे. (Cricket) भारतीय महिला संघ स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध करणार असल्याने या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

विश्वचषकातील भारताची दमदार सुरुवात करण्याचे लक्ष्य 12 जून ते 5 जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये महिला टी-20 विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्पर्धेच्या दहाव्या हंगामात एकूण 12 संघ सहभागी झाले असून त्यांना प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. भारतीय महिला संघाचा समावेश गट क्रमांक 1 मध्ये करण्यात आला असून या गटात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स हे संघ आहेत.महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाने पाच वेळा उपांत्य फेरी गाठली आहे. (Cricket) तसेच 2020 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. मात्र विजेतेपद हुकले होते. गेल्या वर्षी महिला वनडे विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ आता टी-20 विश्वचषकातही विजेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेची सकारात्मक सुरुवात करण्याचा संघाचा प्रयत्न असेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बर्मिंघम येथे 14 जून रोजी सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. त्यानंतर 17 जून रोजी नेदरलँड्सविरुद्ध लीड्स , 21 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मँचेस्टर , 25 जून रोजी बांगलादेशविरुद्ध मँचेस्टर आणि 28 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लॉर्ड्स येथे भारताचे सामने होणार आहेत.स्पर्धेत एकूण 24 दिवसांत 33 सामने खेळवले जाणार आहेत. साखळी फेरीत प्रत्येक संघ आपल्या गटातील सर्व संघांविरुद्ध एक सामना खेळेल.(Cricket) त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेते संघ 5 जुलै रोजी अंतिम सामन्यात आमनेसामने येतील.क्रिकेट चाहत्यांना महिला टी-20 विश्वचषकातील सर्व सामने जिओहॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट पाहता येतील. तसेच स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 HD, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2 HD, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 HD या वाहिन्यांवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
हेही वाचा :
आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू