२०१० मध्ये वर्ल्ड कप उंचावणाऱ्या स्पेनला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नव्हती,(Spain) परंतु यंदा त्यांनी फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.८८ व्या मिनिटाला मिकेल मेरिनोच्या गोलने स्पेनला बेल्जियमवर २-१ असा विजय मिळवून दिला. याच मेरिनोने पोर्तुगालविरुद्ध ९०+१ मिनिटाला गोल करून स्पेनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले होते आणि आज त्याने बेल्जियमला बाद केले. वर्ल्ड कपच्या संपूर्ण इतिहासात, दोन बाद फेरीच्या सामन्यांच्या शेवटच्या ५ मिनिटांत दोन विजयी गोल करणारा तो एकमेव खेळाडू आहे.फॅबियन रुईजने ३०व्या मिनिटाला गोल करून स्पेनला आघाडी मिळवून दिली होती आणि त्याला बेल्जियमकडून चार्ल्स डी केटेलारेने ४१ व्या मिनिटाला उत्तर दिले.

पहिला हाफ १-१ असा बरोबरीत सुटल्यानंतर मध्यंतरात दोन्ही संघ बचावात्मक पवित्र्यात (Spain)दिसले.दरम्यान, या सामन्यात लामिने यमालने विक्रमाला गवसणी घातली. वयाच्या १८ वर्षे ३६३ दिवसांत त्याने आपल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत कारकिर्दीत आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. १९ वर्षांचा होण्यापूर्वी वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक सामने खेळणारा तो युवा खेळाडू ठरला. त्याने उत्तर आयर्लंडच्या नॉर्मन व्हाइटसाइडचा विक्रम मोडला, ज्याने १९ वर्षांचे होण्यापूर्वी पाच सामने खेळले होते.
दुसऱ्या हाफमध्ये ७१ व्या मिनिटाला कोर्टुआला पायाच्या दुखापतीमुळे मैदान सोडावेदुसऱ्या(Spain) हाफमध्ये ७१ व्या मिनिटाला कोर्टुआला पायाच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागल्याने सामन्याला मोठे वळण मिळाले. ८८ व्या मिनिटाला पाऊ कुबार्सीच्या लांबून मारलेल्या शॉटला लॅमेन्सने अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या मिकेल मेरिनोने लगेचच रिबाउंडवर ताबा मिळवला. मेरिनोने विजयी गोल करून स्पेनला २-१ अशी आघाडी मिळवून दिली आणि ती कायम राखताना संघाचा विजय पक्का केला.
हेही वाचा :
कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?
क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?
पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?Edit