संजय राऊत! संशयी राऊत!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

संजय राऊत हे मीडिया शी बोलले नाहीत असा गेल्या काही वर्षात एकही दिवस गेलेला नाही. किंबहुना ते उबाठा गटाचे प्रवक्ते म्हणून रोज सकाळी मीडियासमोर व्यक्त होत असतात. त्यांना त्यासाठी कोणतेही कारण चालतं! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या दालनात जाऊन शरद पवार यांनी भेट घेतल्याबद्दल संजय राऊत हे चांगलेच संतप्त झालेले दिसतात. (Sanjay Raut) वास्तविक कोणी कोणाची आणि केव्हा आणि कुठे भेट घ्यायची हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आहे, याचे भान त्यांना राहिलेले दिसत नाही.

सीमा प्रश्नाच्या संदर्भात एका बैठकीच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार हे विधानभवनात आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे काही आमदारही होते. एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ते अचानक त्यांच्या दालनात आले. तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यस्त होते. पवार हे आपल्या दालनात आले असल्याचे समजल्यानंतर शिंदे हे लगबगीने त्यांच्या जालनात आले. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचे स्वागत केले. (Sanjay Raut) त्यानंतर शरद पवार गटाच्या आमदारांची बैठकच या दालनात झाली. हे अगदी ठरवून नव्हे तर योगायोगाने झालेले दिसते. पण त्यामुळे संजय राऊत हे चांगलेच संतापलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. एका अर्थाने ते गद्दार आहेत आणि गद्दारांची भेट ते कसे काय घेऊ शकतात? असा त्यांचा सवाल आहे. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने शरद पवार एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली.

उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले याबद्दल संजय राऊत यांना संताप येणे हे स्वाभाविक आहे. त्यात ऑपरेशन टायगर अगदी ताजे असल्यामुळे संजय राऊत हे राजकीय दृष्ट्या अस्वस्थ आहेत. (Sanjay Raut) त्यात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेणे हे त्यांना पटलेले नाही.शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे आमदार रोहित पवार,आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांना चांगलेच धारेवर धरले आहे.शरद पवार यांच्या वयाचा, प्रकृतीचा विचार करुन बोलायला हवे होते.अशी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या नाना पटोले यांनी शरद पवार आणि‌ एकनाथ शिंदे यांची भेट ही सामान्य बाब असल्याचे म्हटले आहे.तर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार अस्वस्थ आहेत असे वक्तव्य करून संशयाचे वातावरण तयार केले आहे. आमदार जयंत पाटील वगैरेनी आमचे खासदार अस्वस्थ नाहीत, तुमचेच खासदार अस्वस्थ असतील अशी प्रतिक्रिया देऊन महाविकास आघाडीमध्ये बेकी असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे.

जयंत पाटील आणि भाजपचे विनोद तावडे यांची गोपनीय भेट होणे, त्यानंतर शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेणे, पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार गटाचे खासदार अस्वस्थ आहेत असे म्हणणे, यातून निर्माण झालेल्या राजकीय कल्लोळामध्ये संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या वर अविश्वासू नेते असा हल्लाबोल केला आहे. हेच संजय राऊत , शरद पवार यांचे कौतुक करत होते. किंबहुना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रवक्ते आहेत अशाच थाटात बोलत होते. आणि आता एकदम ते पवारांच्या वर टीका करू लागले आहेत. मागे एकदा शरद पवार संजय राऊत यांना फटकारताना, मी कुठल्या कार्यक्रमाला जायचे आणि कुणाची भेट घ्यायची हे आता तुम्ही ठरवणार का असे म्हटले होते. हे संजय राऊत विसरलेले दिसतात.

हेही वाचा :

बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?

अशैक्षणिक धोरणाविरोधात हजारो शिक्षक रस्त्यावर?

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये जगाला दिसली भारताची ताकद : मोदी?