शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या गाडीवर गोळीबार…

पुणे : शिवसेनेच्या (शिंदे गट) युवासेना जिल्हाप्रमुखांच्या(political updates) गाडीवर अज्ञातांनी गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गाडी पार्क करून जिल्हाप्रमुख कार्यालयात गेल्यानंतर ही गोळी झाडण्यात आली. त्यामुळे त्यांना घाबरवायचे होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, याघटनेने राजकीय(political updates) क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची घटना घडल्याने पुन्हा शहरात ढिशक्यांव-ढिशक्यांव सुरू होते का अशी चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश घारे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दुचाकीवर असलेल्या दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश घारे हे शिवसेनेच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतात. शिवणे परिसरातील गणपती माथा येथे त्यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. दरम्यान, सोमवारी रात्री सहकाऱ्यांसोबत कार्यालयात बैठक घेणार होते. बैठकीच्या वेळेनुसार ते कार्यालयात आले. त्यांनी त्यांची कार कार्यालयाच्या बाहेर पार्क केली आणि ते आत गेले.

कार्यालयात गेल्यानंतर पाठिमागून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी पाठिमागे बसलेल्या एकाने त्यांच्या गाडीवर गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर ते पसार झाले. गोळीबाराचा आवाज झाल्याने निलेश घारे व त्यांचे इतर सहकारी धावत बाहेर आले. प्रथम त्यांना काय झाले हेच समजले नाही. गाडीवर गोळी झाडण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

हेही वाचा :

अक्षय कुमारने परेश रावलला धाडली 25 कोटींची नोटीस; ‘या’ कारणाने संतापला ‘राजू’

गोकुळमधील बंड थंडावलं! मुश्रीफांनी भरला दम अन् अरूण डोंगळेंकडून अध्यक्षपदाचा राजीनामा

ठोकला 500000 रुपयांचा सिक्स, बुलेट शॉटने नवी कोरी कार डॅमेज; Video Viral