राजकारणात अत्यंत महत्त्वाचं केंद्र मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील गोकुळ या राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी दूध संघाचा कारण कोल्हापुरात आमदारकीपेक्षा गोकुळच्या(Gokul) संचालक पदाला जास्त महत्त्व आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. याच गोकुळमध्ये अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून वाद निर्माण झाला आहे. शिंदे-फडणवीसांनी डोंगळेंना राजीनामा न देण्याचं सांगून सतेज पाटील-हसन मुश्रीफ जोडीला शह देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर आता अरूण डोंगळेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हा तिढा काहीसा सुटण्याच्या वाटेवर आहे.

महाविकास आघाडीच्या काळात महाडिकांची तब्बल 25 वर्षांची सत्ता हिसकावून बंटी पाटील म्हणजेच सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या जोडीने गोकुळची(Gokul) सत्ता मिळवली. हा महाडिकांसाठी मोठा धक्का मानला गेला. याच रागातून महाडिकांकडून सतेज पाटलांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातूनच विधानसभेमध्ये अमेय महाडिकांनी ऋतुराज पाटलांचा पराभव केला.
आता ही सूडाची भावना गोकुळच्या माध्यमातूनही समोर येत आहे. त्याचं झालं असं की, ज्यावेळी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या शाहू आघाडीची सत्ता गोकुळमध्ये आली. त्यावेळी पहिले दोन वर्ष सतेज पाटील यांचे नारायण पाटील हे तर त्यानंतर दोन वर्ष म्हणजे सध्या विद्यमान असलेले मुश्रीफांचे अरुणकुमार डोंगळे हे अध्यक्ष होते. तर 25 मे रोजी डोंगळे यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर एका वर्षासाठी नवा अध्यक्ष आणि त्यानंतर निवडणुका घेतल्या जातील. मात्र इथेच खरं खरा ट्विस्ट निर्माण झाला तो ऐन कार्यकाळ संपण्याच्या तोंडावर डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याने.
आता डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार देण्याचं कारण म्हणजे फक्त पदाची लालसा नाही. तर ही महाडीकांची चाल आणि फडणवीसांना गोकुळवर(Gokul) युतीची सत्ता असवी ही इच्छा देखील आहे. त्यातूनच हे सर्व प्रकरण घेऊन महाडीक फडणवीसांकडे गेले. फडणवीसांनी अजित पवार आणि मुश्रिफांना बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी जिल्हा बॅंकेचे कारण देत सहकार्य करायला अनुकूलता दाखवली नाही. त्यात उपमुख्यमंत्री असलेल्या शिंदेंनी देखील इंटरेस्ट घेतला.

कारण सध्याचे अध्यक्ष असलेले डोंगळे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीसांनी डोंगळेंना राजीनामा न देण्याचं सांगून सतेज पाटील-हसन मुश्रीफ जोडीला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे-फडणवीसांनी गोकुळच्या सत्तेमध्ये इंटरेस्ट घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे येण्याऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये विजय मिळवण्यासाठी महायुतीकडे स्थानिक संस्थांमध्ये सत्तेची कमान हाती असणे गरजेचे आहे.
मात्र अखेर आता अरूण डोंगळेनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हा तिढा काहीसा सुटण्याच्या वाटेवर आहे. तसेच पुढील अध्यक्ष कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुश्रीफ आणि सतेज पाटलांनी डोंगळे यांच्या राजीनामा न देण्यावर सडकून टीका केली.त्यांच्याशी मुश्रीफांनी चर्चा देखील केली. तसेच डोंगळेंना थेट दम देखील भरला. त्यानंतर आज अरूण डोंगळे यांनी आपला राजीनामा गोकुळच्या कार्यकारी संचालकांकडे सुपूर्द केला आहे.
हेही वाचा :
भुजबळ राज्याच्या राजकारणातील ट्रम्प कार्ड?, मंत्री बनल्याने पवारांसह फडणवीसांना मिळणार ५ फायदे
व्होडाफोन-आयडिया, एअरटेलला न्यायालयाचा मोठा धक्का!
अक्षय कुमारने परेश रावलला धाडली 25 कोटींची नोटीस; ‘या’ कारणाने संतापला ‘राजू’