श्रेयस अय्यरने धडाकेबाज कामगिरीने करुन दाखवलं, BCCI ने आधी वगळलं

मुंबई : श्रेयस अय्यर हे नाव आज भारताच्याच नव्हे तर जगाच्या क्रिकेटविश्वात गाजतंय. भारतीय क्रिकेट संघाचा मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यरने बीसीसीआयच्या वार्षिक करारात पुन्हा मानाचं स्थान कमावलं आहे. मागील करारात बाहेरचा रस्ता दाखवलेल्या अय्यरने आपल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर बीसीसीआयला पुन्हा दरवाजा उघडायला भाग पाडलंय.

अय्यरने आपल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीने पुन्हा संघ व्यवस्थापनाचे लक्ष वेधले आहे. आयपीएल 2025 च्या चालू हंगामात श्रेयस अय्यर सध्या पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व करतोय. पंजाब संघाने अय्यरच्या नेतृत्वात तुफान कामगिरी केली आहे. मात्र आयपीएल व्यतिरिक्त चॅम्पियन्स ट्रॉफीसह महत्वाच्या मालिकांमध्ये श्रेयस अय्यरने धडाकेबाज कामगिरी केली. त्याचंच फळ सध्या अय्यरला मिळालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *