आजकाल किडनीमध्ये स्टोन होणे, किडनीला सूज येणे आणि किडनी डॅमेज होणे (effective) अशा समस्या सामान्य झाल्या आहेत. तर या समस्या उद्भवण्याचे कारण म्हणजे पाण्याचा अभाव, अस्वस्थ खाण्याच्या सवयी आणि जास्त लोहाचे प्रमाण या सर्वांमुळे किडनीच्या समस्या वाढू लागलेल्या आहेत. जर किडनीच्या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्या गंभीर आजारात बदलू शकतात. किडनीच्या या समस्या दूर करण्यासाठी अनेक उपचार आणि औषधे बाजारात उपलब्ध असली तरी तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने त्यावर उपचार करू शकता. ही आयुर्वेदिक पद्धत अत्यंत प्रभावी आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम तुमच्या शरीराला होत नाहीत.

आयुर्वेद तज्ञ बाबा रामदेव हे नेहमी सोशल मीडियाद्वारे लोकांना आरोग्याशी (effective)संबंधित समस्यांवर उपाय सांगत असतात. यावेळी बाबा रामदेव यांनी किडनीच्या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी एक प्रभावी घरगूती उपाय सांगितला आहे, जे किडनीचे आरोग्य सुधारेल आणि आजार देखील बरे करेल. तर आजच्या लेखात आपण या घरगुती उपायाबद्दल जाणून घेऊयात.बाबा रामदेव यांनी किडनी स्टोन आणि सुज यावर विविध घरगुती उपाय सुचवले आहेत, जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय तुमच्या शरीरासाठी प्रभावी ठरतील. यामध्ये कडुनिंब, पिंपळाच्या पानांचा रस, कसनी आयुर्वेदिक औषधी वनस्पती, सराटा गोखरू,आयुर्वेदिक औषधी वनस्पती कोथिंबीर आणि पुदिना यासारख्या औषधी वनस्पतींचा रस बनवून प्यायल्याने किडनीचे आजार बरे होतात.
तर बाबा रामदेव यांच्या मते, जी लोक दररोज आहारात कोथिंबीर समावेश असतो त्यांची किडनी निरोगी राहते. खरं तर कोथिंबीरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे अ, क, के आणि खनिजे किडनी निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते, ज्यामुळे किडनी योग्यरित्या कार्य करू शकते.
एखाद्याला जर स्टोनची समस्या असेल तर ते काढून टाकण्यासाठी तुम्ही (effective) दररोज कुळीथाच्या डाळीचे सेवन करावे. कारण या डाळीत असलेले काही संयुगे किडनी स्टोन विरघळवातात.बाबा रामदेव हे मधुमेही लोकांना कारल्याचा रस पिण्याचा सल्ला देतात. कारण कारल्याचा रस प्यायल्याने पोट प्रभावीपणे साफ होते. शिवाय, मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर मानले जाते. जर कारल्याचा रस प्यायल जात नाही तेव्हा त्यात टोमॅटो प्यूरी मिक्स करून प्यावे. रामदेव यांच्या मते, आठवड्यातून एकदा तरी कारल्याचा रस प्यायल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठीEdit