संतापजनक बिस्कीट देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला, १९ वर्षाच्या तरुणांकडून ३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार?

तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. घराजवळ खेळत असलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बिहारमधील १९ वर्षीय तरुणाला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास ही मुलगी आपल्या घराजवळ खेळत होती. (shocking) काही वेळानंतर ती अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. स्थानिक रहिवाशांनीही शोधाशोध केली, मात्र ती कुठेचं सापडली नाही. दरम्यान, एका शेजारी राहणाऱ्या महिलेने पोलिसांना सांगितले की तिने एका तरुणाला त्या मुलीला एका रूमच्या दिशेने घेऊन जाताना पाहिले होते.

संध्याकाळी बराच वेळ उलटल्यानंतरही मुलगी घरी परतली नाही. (shocking) त्यामुळे तिच्या आईने परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. या दरम्यान जवळच्या झुडपात मुलगी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. स्थानिकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले, मात्र तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.पोलीस तपासात, आरोपी विबिन मंच याने मुलीला बिस्किटांचे आमिष दाखवून सोबत नेले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. सध्या त्याची कसून चौकशी सुरू असून गुन्ह्याशी संबंधित सर्व बाबींचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे तामिळनाडूमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा :

पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग

शालेय बस-व्हॅन शुल्कात तब्बल 15 टक्क्यांनी वाढ?

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?