नोटाबंदीनंतर २५ कोटींच्या नोटा 10 वर्षे जिल्हा बँकेत धूळ खात?

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोटाबंदीच्या काळापासून जवळपास गेली दहा वर्षे अक्षरश: धुळखात पडलेल्या बँकेच्या हजार – पाचशे रुपयांच्या २५ कोटींच्या नोटा केंद्राकडून अद्यापही बदलून मिळालेल्या नाहीत.सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच याबाबतीत केंद्र सरकारने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. (demonetization) येत्या गुरुवारी – शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केडीसी बँकेच्या 25 कोटींच्या जुन्या नोटांचा प्रश्न मार्गी लागावा अशी बँक वर्तुळाला अपेक्षा आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र सरकारने अचानक एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. या जुन्या नोटा बदलून देण्यासाठी ५२ दिवसांची मुदतही देण्यात आली होती. या कालावधीत कोल्हापूर जिल्हा बँकेला अडीचशे कोटीहून अधिक रकमेच्या नोटा बदलून देण्यात आल्या. मात्र, नोटा बंदी दिवशी ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा बँकेत शिल्लक असलेल्या २५ कोटी २७ लाख रुपयांच्या जुन्या नोटा मात्र बदलून देण्यास केंद्र सरकारने नकार दर्शविला होता.जिल्हा बँक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असल्याने भाजपा प्रणित केंद्र सरकार जाणूनबुजून अडवणूक करीत बँकेच्या नोटा बदलून देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळी केला होता.

अखेर जिल्हा बँकेने २०१७ मध्ये जुन्या नोटा केंद्र सरकारकडून बदलून मिळाव्यात म्हणून न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत केंद्र सरकारनेच निर्णय घ्यावा, असे निर्देश अलीकडेच दिले आहेत. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून स्वर्गीय अजित पवार समर्थक असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष ना.मुश्रीफ हेही महायुतीमध्ये सामील झाले. (demonetization) त्यामुळे नोटा बदलून मिळण्याच्या जिल्हा बँकेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, अद्यापही या नोटा बदलून मिळालेल्या नाहीत. नोटा वेळीच बदलून मिळाल्या असत्या तर हे पैसे व्यवहारात येऊन बँकेला काही कोटींचे व्याजासह उत्पन्न मिळाले असते. ना. शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्यात

जिल्हा बँकेचे चेअरमन ना.हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला साखर कारखानदारी आणि जिल्हा बँकेच्या प्रश्नाबाबत भेटण्यासाठी ना. शहां नी इचलकरंजीत राखीव वेळ दिला आहे. (demonetization) यावेळी कर्जमाफीतील अपात्र 112 कोटींच्या विषया बरोबरच बँकेत धुळखात पडलेल्या 25 कोटी 27 लाख रुपयांच्या जुन्या नोटांचा विषय ही चर्चेला येण्याची शक्यता आहे.ना. शहा यांच्या या भेटीवेळी ना. हसन मुश्रीफ यांच्या सोबतच ना. चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर या महायुतीतील तीन पक्षाच्या तीन मातब्बर मंत्र्यांनी ना. शहा यांना साकडे घातल्यास 25 कोटींच्या नोटांचा प्रश्न सुटेल असा बँकेच्या संचालक मंडळास आशावाद आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?

जल व्यवस्थापनाचे तीन तेरा पाच दशकांनंतर पाणीबाणी!

स्लोव्हाकियाशी भागीदारी वाढवणार : पंतप्रधान मोदी