भिंतीवर खुरपे मारताना विजेचा धक्का १३ वर्षीय पैलवानाचा दुर्दैवी मृत्यू?

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील सम्राट नगर परिसरात विजेच्या धक्क्याने १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. पैलवान ओंकार मोहन कांबळे (वय १३) असे मृत मुलाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हा घराजवळ खुरप्याने खेळत होता. (heartbreaking) यावेळी तो भिंतीवर खुरपे मारत असताना भिंतीलगत अगदी हाताला सहज पोहोचेल अशा उंचीवर असलेल्या विजेच्या तारेस खुरपे लागले. खुरप्याला लाकडी दांडा नसल्याने विद्युत प्रवाह थेट खुरप्यामधून ओंकारच्या शरीरात गेल्याने त्याला जोरदार धक्का बसला. धक्का बसताच तो जागीच कोसळला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व नागरिकांनी तातडीने त्याला कोल्हापूर येथील शासकीय छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (heartbreaking) मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ओंकारचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. (heartbreaking) त्याला दोन भाऊ असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी आहे. लहान वयातच काळाने घाला घातल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सम्राट नगरसह संपूर्ण पट्टणकोडोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये बँक खाते करा चेक?

जल व्यवस्थापनाचे तीन तेरा पाच दशकांनंतर पाणीबाणी!

स्लोव्हाकियाशी भागीदारी वाढवणार : पंतप्रधान मोदी